Kevin Pietersen Trolled Dhoni Viral VIdeo: 2017 सालची गोष्ट... मुंबई इंडियन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायन्ट्स (MI vs RPSG) यांच्यात सामना खेळवला जात होता. इंग्लंडचा स्टार खेळाडू केविन पीटरसन त्यावेळी आयपीएलचं सामालोचन करत होता. सामन्यादरम्यान पुणे संघाचा भाग असलेल्या मनोज तिवारीशी (Manoj Tiwari) बोलणं सुरू होतं. केविन पीटरसनने (Kevin Pietersen) त्यावेळी धोनीला डिवचण्याचा प्रयत्न केला. तिवारीला एमएस धोनीला सांगण्यास सांगितलं की, तो त्याच्यापेक्षा चांगला गोल्फर आहे. त्यावर धोनी खदकन हसला आणि प्रत्युत्तर दिलं. He is still My first Test wicket म्हणजे 'तरीही तो माझा पहिला टेस्ट विकेट होता', असं धोनी (MS Dhoni) म्हणाला होता. धोनीचं हे उत्तर तुफान व्हायरल झालं. त्याच्या उत्तराचे रिल्स तयार झाले. त्यावर आता केपीने (KP) जोरदार प्रत्युत्तर दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केविन पिटरसनने एक व्हिडिओ शेअर (Viral Video) केला आहे. ज्यामध्ये भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील सामना पहायला मिळतोय. या व्हिडिओमध्ये दुर्लभ असा क्षण दिसत आहे. त्याला कारण महेंद्रसिंह धोनी, माहीला बॉलिंग (MS Dhoni bowling Video) करताना खूप कमी लोकांनी पाहिलं आहे. हाफ पिच बॉलिंगची धाव घेत, स्लो मिडल स्पिडवर गोलंदाजी करणाऱ्या धोनीने एक मोठा दावा केला होता. त्याला पिटरसनने व्हिडिओ शेअर करत प्रत्युत्तर दिलंय. 


पाहा video



पुरावा स्पष्ट आहे, मी धोनीची पहिली कसोटी बळी (MS Dhoni First Test Wicket) नव्हतो. तुझी गोलंदाजी छान आहे, असं म्हणत पिटरसनने खदाखदा हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. हा व्हिडिओ पाठवल्याबद्दल केविन पिटरसनने स्काय क्रिकेटचे आभार देखील मानले आहेत. धोनीने केलेल्या दावा केपीने खोडून काढला आहे.


आणखी वाचा - LSG vs MI: बाप दवाखान्यात अन् इकडं पोराने मैदान मारलं, पलटणला नडणारा Mohsin Khan आहे तरी कोण?


दरम्यान, केविन पीटरसन आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखला जातो. टीम इंडियाला त्याने अनेक मोलाचे सल्ले देखील दिले आहेत. भारताकडे ऋषभ पंतचा (Rishabh Pant) बदली खेळाडू तयार आहे. पंजाब किंग्जचा (Panjab Kings) यष्टिरक्षक फलंदाज जितेश शर्माही (Jitesh Sharma) काही खास आहे.  जितेश हा खेळाडू आहे जो टीम इंडियामध्ये (Team India) पंतची जागा घेऊ शकतो, असा सल्ला केपीने दिला होता.