Mohsin Khan IPL 2023: लखनऊ सुपर जायन्ट्स आणि मुंबई इंडियन्स (LSG vs MI) यांच्यात खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या सामन्यात लखनऊने मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला आहे. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात लखनऊने 5 धावांनी सामना नावावर गेला. लखनऊच्या या विजयात सर्वात मोठा हात होता तर तो मोहसिन खान (Mohsin Khan) याचा. अखेरची ओव्हर घेऊन आलेल्या मोहसिनने फक्त 5 धावा दिल्या आणि मुंबईला पाणी पाजलं. मुंबईचं प्लेऑफचं गणित बिघडवणारा मोहसिन खान आहे तरी कोण?
आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत लखनऊ सुपर जायंट्सने (Lucknow Super Giants) मोहसीन खानला संघात सामील करून घेतलं होतं. मोहसीन खान युपीच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील शनिचरा येथे राहणारा आहे. वडील मुलतान खान यूपी पोलिसात उपनिरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. मोहसीन खानला लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशसाठी लिस्ट ए खेळणाऱ्या मोहसिनने दमदार कामगिरी करत सर्वांना आश्चर्यात टाकलं होतं. 2018 मध्ये सर्वात आधी त्याला आयपीएलमध्ये संधी मिळाली. 2018 मध्ये आयपीएल लिलावात त्याला मुंबई इंडियन्सने मुळ किंमतीमध्ये विकत घेतलं होतं. त्यानंतर 2022 साली म्हणजेच मागील हंगामात त्याला लखनऊने संघात घेतलं आणि आज त्याने संधीचं सोनं करत लखनऊला प्लेऑफच्या जवळ पोहोचवलंय.
काही दिवसांपासून मोहसिन खान याचे वडील आजारी आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात ऍडमिट करण्यात आलं होतं. त्यांना जास्त त्रास होत असल्याने आयसीयुमध्ये हलवण्यात आलं होतं. असं असताना देखील मोहसिन खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि प्रेशरमध्ये धारदार गोलंदाजी केली. कालच त्याच्या वडिलांना (Mohsin Khan Father) आयसीयूमध्ये शिफ्ट करण्यात आलंय.
मी सरावात काय केले ते अंमलात आणण्याची योजना आखली होती आणि मी सामन्यात ती अंमलात आणली. मी स्कोरबोर्डकडे न पाहता स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करत होतो आणि 6 चेंडू चांगले टाकले. मी स्लोअर बॉलचा प्रयत्न केला, पण मी त्यापैकी दोन टाकले गेले . त्यानंतर यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला आणि मला यश आलं, असं मोहसिनने म्हटलं आहे.
माझ्या वडिलांना काल ICU मधून डिस्चार्ज मिळाला आणि ते गेल्या 10 दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये होते आणि मी त्यांच्यासाठी हे केलं, ते आजचा सामना पाहत असतील, त्यांच्यासाठी आजचा सामना होता, असं म्हणत मोहसिनने वडिलांना विजय समर्पित केला आहे.
आणखी वाचा - Virat Kohli: विराट कोहलीची मोठी भविष्यवाणी, 'हा' खेळाडू म्हणजे टीम इंडियाचं भविष्य!
दरम्यान, मुंबई इंडियन्सनने (MI Playoffs) लखनऊ विरुद्धचा सामना गमावला असून हैदराबाद विरुद्धचा सामना काहीही करून जिंकावाच लागेल. त्याचबरोबर इतर संघांवर अवलंबून राहावं लागेल. चेन्नईला दिल्लीने पराभूत केल्यास मुंबईसाठी प्लेऑफचं गणित सोपं होईल.