मुंबई : आयर्लंड विरूद्ध T20 मालिका भारताने 2-0 ने खिशात घातली. या मालिकेनंतर ICC ने T20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडिय़ाचा एकही सिनियर खेळाडू नाही आहे. याउलट भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानचा खेळाडू प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका होत आहे. (icc declare t20 ranking babar azam break the record of virat kohli icc rankings team india)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने नुकतीच T20 क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत फलंदाजांच्या यादीत पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पहिल्या क्रमांकावर आहे. बाबर दीर्घकाळापासून टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे. सध्या त्याचे आयसीसी रेटिंग ८१८ आहे, तर कारकिर्दीतील सर्वोत्तम ८९६ आहे. 


टीम इंडियातील खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, विराट, रोहित, धवन सारखा एकही सिनियर खेळाडू या क्रमवारीत नाही आहे. याउलट युवा फलंदाज इशान किशन सातव्या क्रमांकावर आहे. त्याचा एका स्थानाने पराभव झाला आहे. ईशाननंतर दुसरा खेळाडू  केएल राहुल या क्रमवारीत आहे.तो 17 व्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीचा तर  टॉप-20 मध्येही समावेश नाही. विराट कोहली सध्या ५७१ रेटिंगसह २१व्या क्रमांकावर आहे.


दरम्यान फलंदाजांशिवाय गोलंदाज आणि अष्टपैलूंच्या यादीत एकही भारतीय टॉप-10 मध्ये नाही. 



बाबरचा 'विराट' पराक्रम 


बाबर आझमने एक मोठा विक्रम केला आहे, ज्यामध्ये त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले आहे.ICC ने माहिती दिली आहे की, बाबर आझम टी-20 क्रमवारीत सर्वाधिक काळ क्रमांक-1 वर असलेला फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, जो 1013 दिवस टी-20 क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर राहिला होता. 


भारत एक नंबर 


टीम रँकिंगमध्ये भारत टी-20 रँकिंगमध्ये नंबर-1 वर कायम आहे. आयर्लंड विरुद्धची मालिका संपल्यानंतर भारताचे २६८ रेटिंग झाले असून ते नंबर-१ वर आहे. भारतानंतर इंग्लंड २६५ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर आहे


भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही निराशाजनक आकडेवारी असून खेळाडूंवर टीका होतेय.