मुंबई : जेव्हा जेव्हा भारत - पाकिस्तान हे संघ समोरासमोर येतात, तेव्हा सामन्यातला थरार  शिगेला पोहोचतो. खेळल्या जाणाऱ्या मालिकेत भारत विरुध्द पाकिस्तान हा फक्त सामना नाही तर एक युद्धासारखंच वातावरण असतं. भलेही सिरीजचे फायनल हरलो तरी चालेल पण भारत विरुध्द पाकिस्तान ही मॅच हरता कामा नये असा दोन्ही देशाचा समज आहे.  दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांमुळे, भारत-पाकिस्तान संघ केवळ आयसीसी स्पर्धांमध्ये एकमेकांविरूद्ध खेळतात. पण आता क्रिकेट जगतात मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही देशांच्या क्रिकेट प्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे.  भारत आणि पाकिस्तानचे संघ आयसीसी स्पर्धां व्यतिरिक्त पुन्हा एकदा एकमेकांविरूद्ध मैदानात उतरतांना दिसणार आहेत. एवढचं नाही तर यावर्षी भारतात होणाऱ्या टी -२० विश्वचषकात पाकिस्तानच्या समावेशा बाबतीत आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. गेल्या 8 वर्षानंतर पहिल्यांदाच पाकिस्तान भारतात येवून सिरीज खेळणार असल्याची चर्चा होत आहे.  


यावर्षी भारतात ऑक्टोबरमध्ये टी -२० विश्वचषक  होणार आहे. आयसीसीच्या नियामक मंडळाने बीसीसीआयशी पाकिस्तानी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या व्हिसा आणि कर कराराबाबत बोलणी सुरू असल्याची चर्चा आहे. 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी आयसीसीला टी -२० विश्वचषकापूर्वी  पाकिस्तानी खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांच्या व्हिसाची हमी मागितली आहे. म्हणजेच यावर्षी पाकिस्तान टी -२० विश्वचषकासाठी तयार होत आहे. तसेच भारत दौऱ्याची तयारी करतांना दिसत आहे. तरी आयसीसी यांवर काय भूमिका घेते, हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.