मुंबई : टी 20 वर्ल्ड कपला (T 20 World Cup 2022) अवघे काही दिवस राहिले आहेत. टी 20 वर्ल्ड कपला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होतेय. त्याआधी क्रिकेट विश्वातून (Cricket News) मोठी बातमी समोर आली आहे. फिक्सिंगच्या मुद्द्यामुळे पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे.  एका स्टार खेळाडूवर फिक्सिंग प्रकरणी 14 वर्षांची बंदी घातली आहे. त्यामुळे जवळपास या क्रिकेटरची कारकिर्द संपल्यात जमा आहे. आयसीसीने याबाबतची माहिती दिली आहे.  (icc international cricket council bans uae cricketer mehar chhyakar for 14 years due to match fixing)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहर छायाकर (Mehar Chhayakar) असं या कारवाई करण्यात आलेल्या क्रिकेटरचं नाव आहे. मेहर विकेटकीपर बॅट्समन आहे. हा क्रिकेटर यूएईसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळतो. मेहर 2019 मध्ये एका आंतरराष्ट्रीय मालिका आणि कॅनेडात टी 20 स्पर्धेत खेळला होता. यामध्ये मेहरवर फिक्सिंग संदर्भात 7 आरोपांचा ठपका ठेवण्यात आला होता. आता मेहरला या आरोपांखाली दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे मेहरला 14 वर्ष कोणत्याही प्रकारंच क्रिकेट खेळता येणार नाही. 


मेहरची प्रतिक्रिया


मी निर्दोष आहे. मला या प्रकरणात गोवलं जातंय, असं म्हणत मेहरने या आरोपांचं खंडन केलंय. दरम्यान आयसीसीने याआधी गेल्यावर्षी यूएईच्या 2 खेळाडूंचं निलंबन केलं होतं. मोहम्मद नावीद आणि शैमान अनवर बट असं या क्रिकेटपटूंचं नाव होतं. या दोघांवर 2019 च्या टी 20 वर्ल्ड कप क्वालिफायर सामन्यात फिक्सिंग केल्याचा आरोप करण्यात आला होता.