ICC Bowling Rankings: नुकत्याच झालेल्या एशिया कप 2023 स्पर्धेत (Asia Cup 2023) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) जेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा धुव्वा उडवत ऐतिहासिक विजय मिळवला. याचा फायदा आता टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी क्रमवारीत झाला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट आऊंसिल अर्थात आयसीसीने एकदिवसीय क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत (ICC ODI Ranking) टीम इंडियाचा खेळाडू जगातला नंबर वन गोलंदाज बनला आहे. टीम इंडियाच्या विजयात या गोलंदाजाने महत्वाची भूमिका बजावली होती. अंतिम सामन्यात हा गोलंदीज टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

क्रमवारीत मोठा उलटफेर
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मोठी उलथापालथ झाली आहे. कोलंबोत श्रीलंकेला 50 धावांवर गुंडाळणाारा मोहम्मद सिराजने आयसीसी वन डे क्रमवारीत जबरदस्त झेप घेतली आहे. मोहम्मद सिराज अव्वल स्थानावर पोहोचला आहे. याआधी मार्च 2023 सिराज नंबर वन गोलंदाज बनला होता. 


एशिया कपममध्ये सिराजचा बोलबाला
मोहम्मद सिराजने एशिया कप 2023 स्पर्धेत 12.2 च्या रनरेटने 10 विकेट घेतल्या. यामुळे सिराजने थेट आठ स्थानांची झेप घेतली. हेजलवूड, ट्रेंट बोल्ट, राशिद खान आणि मिशेल स्टार्क या दिग्गज गोलंदाजांना सिराजने मागे टाकलं आहे. 


अंतिम सामन्यात विजयाच हिरो
एशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात मोहम्मद सिराज नावाचं वादळ आलं होतं. अवघ्या सात षटकात सिराजने 21 धावा देत 6 विकेट घेतल्या. यातही एकाच षटकात चार विकेट घेण्याचा विक्रम त्याने केला. यातल्या तीन फलंदाजांना भोपळाही फोडता आला नव्हता. वेगवान पाच विकेट घेण्याचा रेकॉर्डही सिराजच्या नावावर जमा झाला आहे. 



टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
एशिया कप 2023 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर 10 विकेट ऐतिहासिक विजय मिळवला. भारताने तब्बल आठव्यांदा एशिया कपच जेतेपद मिळवलं.टीम इंडियाला तब्बल 1.24 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळाले आहे. श्रीलंकेला जवळपास 62 लाख 31 हजार रुपये प्राईज मनी मिळाली. अंतिम सामन्यात प्लेअर ऑफ द मॅच ठरलेल्या मोहम्मद सिराजला चार लाख दहा हजार रुपयांचं बक्षिस मिळालं. ते त्याने लंकेच्या ग्राऊंड्समॅनला डोनेट केले. स्पर्धेत नऊ विकेट घेणाऱ्या कुलदीप यादवला मॅन ऑफ द सीरिजचा खिताब मिळाला. त्याला 12 लाख 46 हजार रुपये बक्षीस म्हणून मिळाले.