क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! 8 वर्षात होणार 10 वर्ल्ड कप, टीम वाढवण्याचाही निर्णय
ICCने 2024 ते 2031 पर्यंतचा कार्यक्रम निश्चित केला आहे. 8 वर्षांत 10 वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात आलं आहे.
मुंबई: टीम इंडिया 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. या सामन्याआधी क्रिकेटप्रेमींसाठी मोठी खुशखबर आहे. IPL 2021चे उर्वरित सामने UAEमध्ये होणार आहेत. त्याच सोबत ICCने आता 2024 ते 2031 8 वर्षांच्या वर्ल्ड कप संदर्भात नियोजन आणि प्लॅनिंग सुरू केलं आहे.
या 8 वर्षांत एकूण 10 वर्ल्ड कप सामने खेळवले जाणार आहेत. तर दुसरीकडे टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 संघ खेळणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार टी 20 वर्ल्डकप दर दोन वर्षांनी होणार आहे.
वन डे वर्ल्ड कपमध्ये 2027 मध्ये एकूण 14 संघ सहभागी होऊ शकणार आहेत. ICCने 2024 ते 2031 पर्यंतचा कार्यक्रम निश्चित केला आहे. त्यानुसार यंदा होणाऱ्या वर्ल्डकपचं नियोजन करण्यासाठी BCCIला ICCने 28 दिवसांचा अवधी दिला आहे.
2024 ते 2031मध्ये 4 टी 20 वर्ल्ड कप होणार आहेत. 2024, 2026, 2028 आणि 2030मध्ये होणाऱ्या या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी 20 संघ भाग घेतील. त्याशिवाय 2 वन डे वर्ल्ड कप आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामध्ये 14 संघ सहभागी होऊ शकणार आहेत.
या दरम्यान 2 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 4 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप देखील होणार आहे. 8 संघांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि 2029मध्ये खेळवली जाणार आहे. 2025, 2027, 2029 आणि 2031 या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने खेळवले जाणार आहेत.
वन डे वर्ल्ड कपसाठी सात-सात टीमचे दोन गट असणार आहेत. त्यामधून दोन्ही गटातील तीन संघ पुढे जातील. त्याच्यात सुपरसिक्स सामने होतील आणि त्यातून फायनल आणि सेमीफायनल सामने खेळवले जातील.
टी 20 वर्ल्ड कपसाठी 5 संघांचे 4 गट असणार आहेत. त्यातून प्रत्येक गटातील 2 संघ सुपर 8मध्ये पोहोचतील. त्यातून पुढे आलेल्या संघांमध्ये सेमीफायनल आणि फायनलचे सामने खेळवले जाणार आहेत. आयसीसीने जाहीर केलेले हे सामने क्रिकेटप्रेमींसाठी खरी मेजवानीच असणार आहे.