मुंबई : आयसीसीनं २०२० साली होणाऱ्या महिला आणि पुरुष टी-२० वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. हे दोन्ही वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जातील. २१ फेब्रुवारी ते ८ मार्च २०२० या कालावधीत महिलांचा तर १८ ऑक्टोबर तर १५ नोव्हेंबरपर्यंत पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप खेळवण्यात येईल. महिला वर्ल्ड कपमध्ये १० टीम सहभागी होतील. यातल्या २ टीम क्वालिफायर असतील. तर पुरुषांच्या वर्ल्ड कपमध्ये १६ टीम असतील, यातल्या ८ क्वालिफायर टीम असतील. पुरुष टी-२० वर्ल्ड कपच्या ८ टीममध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानला थेट प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि अन्य ६ टीमना क्वालिफायर टूर्नामेंट खेळावी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरुष वर्ल्ड कपमध्ये सुरुवातीला ८ क्वालिफायर टीममध्ये मुकाबला होईल. यातल्या ४ टीम सुपर-१२ मध्ये प्रवेश करतील, ज्यातल्या ८ टीम आधीच ठरलेल्या आहेत. सुपर-१२ च्या टीमना ग्रुप ए आणि ग्रुप बी मध्ये वाटण्यात आलंय. भारताचा समावेश ग्रुप बी मध्ये आहे. यामध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि दोन क्वालिफायर टीम असतील. तर ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि क्वालिफायरच्या २ टीम असतील. पुरुष टी-२० वर्ल्ड कपमध्ये २९ दिवसांमध्ये ४५ मॅच खेळवल्या जातील. २४ ऑक्टोबरला भारताची पहिली मॅच दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे. तर सेमी फायनल ११-१२ नोव्हेंबरला आणि फायनल १५ नोव्हेंबरला रंगेल.


टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक


पहिला राऊंड


१८ ऑक्टोबर, २०२०


श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर ए-३


क्वालिफायर ए-२ विरुद्ध क्वालिफायर ए-४


१९ ऑक्टोबर 


बांग्लादेश विरुद्ध क्वालिफायर बी-३


क्वालिफायर बी-२ विरुद्ध क्वालिफायर बी-४ 


२० ऑक्टोबर 


क्वालिफायर ए-३ विरुद्ध क्वालिफायर ए-४


श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर ए-२


२१ ऑक्टोबर


क्वालिफायर बी-३ विरुद्ध क्वालिफायर बी-४ 


बांग्लादेश विरुद्ध क्वालिफायर बी-२


२२ ऑक्टोबर 


क्वालिफायर ए-२ विरुद्ध क्वालिफायर ए-३


श्रीलंका विरुद्ध क्वालिफायर ए-४


२३ ऑक्टोबर 


क्वालिफायर बी-२ विरुद्ध क्वालिफायर बी-३ 


बांग्लादेश विरुद्ध क्वालिफायर बी-४


सुपर १२ 


२४ ऑक्टोबर 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान 


भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 


२५ ऑक्टोबर


ए-१ विरुद्ध बी-२


न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडिज 


२६ ऑक्टोबर 


अफगाणिस्तान विरुद्ध ए-२ 


इंग्लंड विरुद्ध बी-१ 


२७ ऑक्टोबर 


न्यूझीलंड विरुद्ध बी-२ 


२८ ऑक्टोबर 


अफगाणिस्तान विरुद्ध बी-१


ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्टइंडिज


२९ ऑक्टोबर


पाकिस्तान विरुद्ध ए-१


भारत विरुद्ध ए-२ 


३० ऑक्टोबर 


इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका 


वेस्ट इंडिज विरुद्ध बी-२ 


३१ ऑक्टोबर 


पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड


ऑस्ट्रेलिया विरुद्ध ए-१ 


१ नोव्हेंबर 


दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान 


भारत विरुद्ध इंग्लंड 


२ नोव्हेंबर 


ए-२ विरुद्ध बी-१


न्यूझीलंड विरुद्ध ए-१


३ नोव्हेंबर 


पाकिस्तान विरुद्ध वेस्टइंडिज


ऑस्ट्रेलिया विरुद्ध बी-२ 


४ नोव्हेंबर 


इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान


५ नोव्हेंबर


दक्षिण आफ्रिका विरुद्ध ए-२


भारत विरुद्ध बी-१ 


६ नोव्हेंबर 


पाकिस्तान विरुद्ध बी-२ 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड 


७ नोव्हेंबर 


इंग्लंड विरुद्ध ए-२ 


वेस्टइंडिज विरुद्ध ए-१ 


८ नोव्हेंबर 


दक्षिण आफ्रिका विरुद्ध बी-१


भारत विरुद्ध अफगाणिस्तान


सेमी फायनल 


११ नोव्हेंबर, सिडनी 


१२ नोव्हेंबर, ऍडलेड 


फायनल


१५ नोव्हेंबर २०२०, मेलबर्न