दुबई : आयसीसी टी 20 वर्ल्ड कपमधील अंतिम सामन्यात  (Icc t 20 world 2021) ट्रॉफीसाठी न्यूझीलंड विरुद्घ ऑस्ट्रेलिया (Australia vs New zealand) भिडणार आहेत. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये (Dubai International Cricket Stadium)  खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडची टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात पोहचण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर ऑस्ट्रेलियाची दुसरी वेळ आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा वर्ल्ड कप जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टार ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) या स्पर्धेत सुरुवातीपासून धमाकेदार फॉर्मात आहे. वॉर्नरने या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने 6 सामन्यात 47.20 च्या एव्हरेजने 236 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने 2 अर्धशतकही लगावले. या महामुकाबल्यात वॉर्नरला रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. (icc t 20 world cup 2021 final match new zealand vs australia opener david warner 30 runs away from break Matthew Hayden record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे रेकॉर्ड?


वॉर्नरला ऑस्ट्रेलियाकडून एका टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम करण्याची संधी आहे. वॉर्नरने न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात 30 धावा केल्यास, तो हेडनला मागे टाकेल. तसेच टी 20 वर्ल्ड कपच्या एका स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा रेकॉर्ड ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनच्या (Matthew Hayden) नावे आहे.


हेडनने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाकडून 265 धावा केल्या होत्या. हेडननंतर दुसऱ्या क्रमांकावर माजी ऑलराऊंडर शेन वॉटसन आहे. वॉटसननने 2012 च्या वर्ल्ड कपमध्ये 249 रन्स केल्या होत्या. तर वॉर्नर  236 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात वॉर्नर धमाकेदार खेळी करुन रेकॉर्ड ब्रेक करणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.