मुंबई : आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी (ICC Test Rankings) जाहीर केली आहे. या टेस्ट रॅंकिगमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंची  (WTC Final 2021) पराभवानंतर घसरण झाली आहे. तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमन्सला (kane williamson) फायदा झाला आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत टॉपला पोहचलेला टीम इंडियाचा रवींद्र जाडेजालाही (Ravindra Jadeja) अव्वल स्थान गमवावं लागलं आहे.  फलंदाजांच्या यादीत टॉप  10 मध्ये 3 भारतीय फलंदाजांचा समावेश आहे. पण त्यापैकी 2 जणांना आपले स्थान कायम राखण्यास यश आले आहे. तर एका बॅट्समनची घसरण झाली आहे. (icc test ranking Kane Williamson is back to the No 1 spot in the batting ranking) 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 
विराटचं स्थान कायम


 


याआधी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एका क्रमांकाचा फायदा झाला होता. त्याने 5 व्या क्रमांकावरुन चौथ्या स्थानी झेप घेतली होती. यावेळेस जरी विराटला उडी  घेता आली नसली तरी त्याने चौथं स्थान कायम राखण्यात यश मिळवलं आहे. विराट 812 रेटिंग्स पॉइंट्ससह चौथ्या स्थानी कायम आहे. 


हिटमॅन कायम तर पंतची घसरण


रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर होते. पण पंतला निराशाजनक कामगिरीचा फटका बसला आहे. त्याची सातव्या स्थानी घसरण झाली आहे. रिषभने न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम सामन्यात संघर्षपूर्ण खेळी केली. पण त्यानंतरही त्याची घसरण झाली. पंतची 752 पॉइंट्ससह सातव्या क्रमांकावर घसरण झाली आहे. तर रोहितला  सहावं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरला आहे.


अव्वल स्थानी कोण?


मागील कसोटी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने (Steven Smith) न्यूझीलंडच्या केन विलियमन्सनला पछाडत पहिलं स्थान काबीज केलं होतं. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयनशीपचं अजिंक्यपद जिंकल्यानंतर केनने पुन्हा स्टीव्हला मागे खेचत पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. केनच्या नावे आता  901 रेटिंग्स पॉइंट्स आहेत.  


संबंधित बातम्या :


अभिमानास्पद! टीम इंडियातील 3 खेळाडूंची अर्जुन तर दोघांची खेलरत्नसाठी शिफारस


Mohammed Shami च्या फॉर्म हाऊसचे फोटो, करोडो रुपयांची प्रॉपर्टी


टी 20 वर्ल्ड कपच्या तारखां जाहीर, UAEसोबत पहिल्यांदाच 'या' देशात होणार सामने