दुखापत असतानाही खेळला `हा` खेळाडू, विजयात याचा मोठा वाटा
पायाच्या दुखण्यामुळे त्याचं अंडर 19 विश्व कपमध्ये खेळणं कठिण होतं पण...
कोलकाता : पायाच्या दुखण्यामुळे त्याचं अंडर 19 विश्व कपमध्ये खेळणं कठिण होतं पण...
फास्ट बॉलर ईशान पोरेलने आपल्या दुखण्याला बाजूला सारत टीमला जिंकण्यात मोठं योगदान दिलं. त्याचा कोच विभाष दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोरेलच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. या दुखण्यातून सावरायला त्याला 3 आठवड्यांचा कालावधी लागणार होता. मात्र ईशानने 12 दिवसांतच वापसी केली. आणि पाकिस्तान विरूद्धच्या सेमीफायनलमध्ये सहा ओव्हरमध्ये 17 धावा देऊन चार विकेट घेतल्या.
दास यांनी सांगितले की, तो पूर्णपणे फिट झालेला नाही. दुखापत झालेली असून देखील त्याने गोलंदाजी केली. पायाला पट्टी लावून त्याने हा सामना खेळला आहे. त्यांनी सांगितले की, न्यूझीलँडमधील चांगल्या उपचारामुळेच तो तीन नॉकआऊट खेळ खेळला आहे. पोरेल या अगोदर टेबल टेनिस खेळाडू होता. आता तो क्रिकेटमध्ये चांगला गोलंदाज आहे.
असं केलं सेलिब्रेशन
अशा प्रकारच्या सेलिब्रेशनला हायपनोसीस सेलिब्रेशन असे म्हणतात. सर्व खेळाडू एकत्र जमा होतात होऊन हवेच्या माध्यमातून जाणारी (अदृश्य) शक्ती बाहेर सोडायची. जेव्हा एखादा संघ एखाद्या सामन्यात किंवा स्पर्धेमध्ये इतरांपेक्षा खूपच वरचढ खेळ करतो त्यावेळी हे सेलिब्रेशन केले जाते. हायपनोसीस सेलिब्रेशन 'फिफा १८' मध्ये पाहायला मिळालं होतं.