मुंबई : आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप 2022च्या (ICC Womens World Cup 2022) यजमानपदाचा मान हा न्यूझीलंडला मिळाला आहे. या वनडे महिला वर्ल्ड कपची सुरुवात 4 मार्चपासून होत आहे. तर अंतिम सामना 3 एप्रिलला ख्राईस्टचर्चमध्ये खेळवण्यात येणार आहे. वर्ल्ड कपसाठी एकूण 8 संघ आमनेसामने भिडणार आहेत. या स्पर्धेच्या साखळी सामन्यात एकूण 31 सामने खेळवण्यात येणार आहेत.  एकूण 6 ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाच्या (Team India) मिशन वर्ल्ड कपची सुरुवात ही थरारक अशी होणार आहे. (icc womens 50 over world cup 2022 know team india schedule and squad)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्ल्ड कपमधील पहिला सामना 


वर्ल्ड कपमधील पहिला सामना हा न्यूझीलंड विरुद्ध वेस्टइंडिज यांच्यात खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीत एकूण 8 संघांमध्ये 31 सामने पार पडणार आहेत. तर या सामन्यांचं एकूण 6 ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे. ऑकलँड, टॉरंगा, हॅमिल्टन, वेलिंग्टन, ख्राईस्टचर्च आणि डुनेडिन या ठिकाणी सामने खेळवण्यात येणार आहेत. 


टीम इंडिया-पाकिस्तान आमनेसामने


टीम इंडियाच्या या वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात ही कट्टर आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याने होणार आहे. हा हायव्होलटेज सामना 6 मार्चला खेळवण्यात येणार आहे. 


टीम इंडिया या संपूर्ण स्पर्धेत साखळी फेरीत एकूण 7 सामने खेळणार आहे. विशेष म्हणजे हे सर्व सामने सकाळी लवकरच सुरु होणार आहेत. 


वर्ल्ड कपसाठी निवड समितीने टीम इंडियाच्या मुख्य संघात फारसे बदल केलेले नाहीत. मिताली राज या महत्त्वाच्या स्पर्धेत टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर हरमनप्रीत कौरकडे उप-कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे.


टीम इंडियांचं वेळापत्रक (Womens One Day World Cup 2022 Team India Schedule)


टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान - 6 मार्च


टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड - 10 मार्च


टीम इंडिया विरुद्ध वेस्टइंडिज -12 मार्च


टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड -16 मार्च


टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया -19 मार्च


टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश - 22 मार्च


टीम इंडिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - 27 मार्च


वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया :


मिताली राज (कर्णधार), हरमनप्रीत कौर (उप-कर्णधार), स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, तानिया भाटिया, स्नेह राणा, झूलन गोस्वामी, पूजा वस्त्राकर, मेघना सिंह, रेणुका सिंह ठाकुर, राजेश्वरी गायकवाड आणि पूनम यादव.