IND vs PAK: `भारत डोळे दाखवत असेल तर...`, BCCI वर बोलताना Shahid Afridi ला झाली उपरती!
Pakistan vs India, Asia Cup: तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल, असं Shahid Afridi म्हणालाय.
Pakistan vs India, Asia Cup: भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील वाद काही नवी गोष्ट नाही. क्रिकेटमुळे अनेकदा दोन्ही देश जवळ आलेत तर, अनेकदा दोन्ही देशांमधील संबंध दुरावल्याचं देखील पहायला मिळायलं. अशातच आता भारत आणि पाकिस्तानमध्ये वाद उभा राहिलाय, त्याचं कारण म्हणजे आगामी आशिया कप.. आशिया कप (Asia Cup 2023) जर पाकिस्तानमध्ये खेळवला जाणार असेल तर भारत भाग घेणार नाही, असं भारताने ठणकावून सांगितलंय. त्यावर आता पाकिस्तानचा माजी स्टार क्रिकेटर शाहिद अफ्रिदीने मोठं वक्तव्य केलंय. (Shahid Afridi on BCCI refusal to send Team India to Pakistan for Asia Cup 2023)
काय म्हणाला Shahid Afridi ?
जेव्हा एखादा देश स्वत:च्या पायावर उभा राहू शकत नाही, तेव्हा त्यांना निर्णय घेणं इतकं सोपं नसतं. अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. भारत डोळे दाखवत असेल तर त्यांनी स्वत:ला मजबूत केलंय. त्यामुळे ते अशी गोष्ट करू शकतात, असं शाहिद अफ्रिदी ( Shahid Afridi) म्हणालाय.
तुम्ही स्वतःला मजबूत करा आणि मग निर्णय घ्या. आशिया चषकात (Asia Cup 2023) भारत येईल की नाही किंवा पाकिस्तान भारतात जाईल की नाही याची मला कल्पना नाही. पण पाकिस्तान बोर्डाला कुठेतरी भूमिका घ्यावी लागेल. आयसीसीची (ICC) भूमिका खूप महत्त्वाची असायला हवी होती, आयसीसीने पुढे यायला हवे होते. पण भारतीय क्रिकेट बोर्डासमोर (BCCI) आयसीसीही काही करू शकणार नाही, असं वक्तव्य देखील शाहिद अफ्रिदीने केलं आहे.
आणखी वाचा - आताची मोठी बातमी! टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर मुंबईत हल्ला
दरम्यान, भावनेच्या भरात मी पण म्हणेन की भारतात जायची गरज नाही. पण हे निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतले जातात. अनेक गोष्टी पाहाव्या लागतात. तुम्हाला तुमची आर्थिक व्यवस्था पाहावी लागेल. सध्या तुमची प्रकृती वाईट आहे, अशा स्थितीत भावनिक होऊन निर्णय घेता येत नाही, असा म्हणत शाहिद अफ्रिदीला (Shahid Afridi On BCCI) उपरती झाल्याचं पहायला मिळतंय.