Mohammed Shami : आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा (India beat New zealand) पराभव  केल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव आहे ते म्हणजे मोहम्मद शमी (Mohammad Shami). यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत शमीने आपल्या भेदक गोलंदाजीने खळबळ उडवून दिली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने तब्बल 7 विकेट घेतल्या. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तब्बल तिसऱ्यांदा त्याने पाच विकेट घेण्याची किमया केली आहे. अवघ्या सहा सामन्यात शमीने 23 विकेट घेतल्या असून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. तर विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासत सर्वाधिक विकेट घेणार तो भारतीय गोलंदाजही ठरला आहे. शमीने आतापर्यंत खेळलेल्या विश्वचषक स्पर्धेतील 17 सामन्यात 50 विकेट घेतल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरोहाच्या मुलाने जग जिंकलं
मोहम्मद शमीचा जन्म उत्तर प्रदेशमधल्या (Uttar Pradesh) अमरोहा इथला आहे. आपल्या आयुष्यात शमीला अनेक चढउतारांना सामोरं जावं लागलं. शमीच्या याच संघर्षमय जीवनावर उत्तराखंडच्या खानपूर मतदार संघाचे अपक्ष उमेदवार उमेश कुमार पुस्तक लिहिणार आहेत. या पुस्तकाचं नाव असणार आहे '30 डेज विथ शमी'


X अकाऊंटवर आमदार उशेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे. शमीच्या आयुष्यातील सर्वात संघर्षमय ठरलेल्या त्या एक महिन्यावर हे पुस्तक असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध फिक्सिंगचा आरोप, त्यानंतर दोनदा आत्महत्येचा प्रयत्न, तो एक महिना ज्याचा प्रत्येक दिवस त्याच्यासाठी जीवन-मरणाचा प्रश्न होता. तो एक महिना ज्यात त्याने आपल्या घरातल्या 19 व्या मजल्यावरुन उडी मारण्याचा मनात विचार आणला. हा संपूर्ण संघर्ष '30 Days With Shami' या पुस्तकात असणार आहे, असं उमेश कुमार यांनी म्हटलंय. 


शमीवर त्याच्या पत्नीने बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा गंभीर आरोप केला. पाकिस्तानविरुद्ध फिक्सिंगचे पैसे घेतल्याचा आरोप करत त्याच्या पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली. इतकंच नाही तर शमीची आई, भाऊ, बहिण यांनाही तुरुगांत पाठवण्याचा कट रचण्यात आला. विश्वचषक स्पर्धा सुरु होण्याच्या दोन दिवस आधी कोलकाता कोर्टात डोळ्यात अश्रू घेऊन जामीनासाठी उभा राहिला, त्या मोहम्मद शमीवर उमेश कुमार पुस्तकात लिहिणार आहेत.  


सेमीफायनलमध्ये शमीचं वादळ
या सर्व समस्यांवर मात करत लढवय्या मोहम्मद शमी विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा हिरो ठरतोय. 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आलेल्या पहिल्या सेमीफायनलमध्ये मोहम्मद शमीने तब्बल सात विकेट घेत ऐतिहासिक कामगिरी केली. टीम इंडियाने टॉस जिंकत पहिली फलंदाजी घेतली. विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या शानदार शतकाच्या जोरावर टीम इंडियाने 397 धावांचा डोंगर उभा केला. यानंतर गोलंदाजीत मोहम्मद शमीने भेदक गोलंदाजी करत न्यूझीलंडच्या फलंदाजीला सुरुंग लावला. अवघ्या 57 धावात शमीने 7 विकेट घेतल्या. विश्वचषक स्पर्धेतील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरलीय.


पीएम मोदी यांनी केलं कौतुक
पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्यासह देशातील अनेक दिग्गजांनी मोहम्मद शमीच्या या कामगिरीच कौतुक केलं आहे. पीएम मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, 'भारताने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, दमदार फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीने आमच्या संघाला जिंकण्याचा विश्वास दिलाय, अंतिम फेरीसाठी शुभेच्छा' मोहम्मद शमीची कामगिरी येणाऱ्या अनेक पिढ्या लक्षात ठेवतील, शमी चांगला खेळला' असं पीएम मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटंलय. 


तर 'टीम इंडिया एका बॉससारखी अंतिम फेरीत पोहोचलीय' अशा शुभेच्छा गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्यात.