ICC World Cup 2023 : मंगळवारी आयसीसीकडून एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषकासाठीचं वेळापत्रक जारी करण्यात आलं. यामध्ये मुंबई- पुण्यासह भारतातील विविध शहरांमधील स्टेडियममध्ये हे सामने पार पडणार असल्याचं स्पष्ट झालं. सोबतच विश्वचषकामध्ये नेमके कोणकोणते संघ सहभागी होणार यावरूनही पडदा उठला. यातही विशेष चर्चा झाली ती म्हणजे या विश्वचषकामध्ये खेळवल्या जाणाऱ्या भारत- पाकिस्तान या दोन्ही देशांच्या सामन्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Ins Vs Pak सामना कधी आहे, किती वाजता आहे इथपासून तो कुठं आहे, आपण तो प्रत्यक्ष तिथं जाऊन पाहू शकतो का असे प्रश्न अनेकांनीच विचारले. पण, आता पाकिस्तान या स्पर्धेसाठी भारतात येणार का? यावरच सारंकाही आधारित असल्याचं पाहायला मिळत आहे. 


... तर पाकिस्तान विश्वचषकात खेळणार नाही 


पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आयसीसीकडे विश्वचषकाच्या वेळापत्रकात बदल सुचवले आणि त्यांची ही शिफारस ICC नं नाकारली. इथं पाकिस्तानचा भारताविरोधातील सामना अहमदाबादमध्ये होणार असला तरीही त्यांनी अफगाणिस्तान (Afghanistan) आणि ऑस्ट्रेलियाविरोधातील (Australia) सामन्यांची ठिकाणं बदलण्याची मागणी केली होती. अर्थात त्याचा फार परिणाम होताना दिसला नाही. कारण, आयसीसी आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं वेळापत्रक जाहीर होताच स्पष्ट झालं. 


हेसुद्धा वाचा : 'Pizza चा खापर खापर पणजोबा' साडला! उत्खननातून समोर आली इटालियन पिझ्झाची 2000 वर्षांपूर्वीची रेसिपी


सामन्याचं ठिकाण का बदलावं? 


सूत्रांच्या माहितीनुसार चेपॉकवरील फिरफीचा फायदा अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना होऊ शकतो ज्यामुळं तिथं सामन्यासाठी पाकिस्तान तयार नसल्याचं म्हटलं जात आहे. इतकंच नव्हे तर आता तर चक्क सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेतील सहभागाबाबतच पाकिस्ताननं साशंक भूमिका मांडली आहे. 


निर्णय घेऊ आणि नंतरच ठरवू... 


विश्वचषक वेळापत्रकाची घोषणा झाल्यानंतर अद्यापही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून यावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. इतकंच नव्हे तर, आता पाकिस्तान या स्पर्धेत खेळणार की नाही हाच प्रश्न उपस्थित होत आहे. कारण, अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार आता आयसीसीचं हे वेळापत्रक पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (PCB) आता पाकिस्तान सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे.  


परिणामी भारत पाकिस्तान सामनाच काय, आता पाकिस्तानचा संघ विश्वचषकाच खेळणार की नाही हे त्या देशाचं सरारच ठरवणार आहे. ज्यामुळं नकार मिळाल्यास हा संघ स्पर्धेत दिसणार नाही अशीही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा आता पाक सरकार यावर काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं.