IND vs BAN Probable Playing XI: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा आतापर्यंतचा प्रवास शानदार झालाय. टीम इंडियाने (Team India) सलग तीन सामने जिंकत विजयाची हॅटट्रीक केलीय. पहिल्या सामन्यात बलाढ्य ऑस्ट्रेलियावर एकतर्फी विजय मिळवला. तर दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानवर मात केली. तिसऱ्या सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानाला धुळ चारली. आता चौथ्या विजयासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. चौथ्या सामन्यात भारतासमोर बांगलादेशचं आव्हान असणार आहे. पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट संघाच्या स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी बारा वाजता हा सामना सुरु होईल. या सामन्यात विजय मिळवल्यास भारताचा सेमीफायनलचा रस्ता जवळपास मोकळा होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या खेळाडूंना संधी मिळणार?
सुरुवातीच्या तिनही सामन्यात टीम इंडियाने बेस्ट प्लेईंग इलेव्हन (Playing XI) मैदानात उतरवली होती. फलंदाजी आणि गोलंदाजीत टीम इंडियाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. आता चौथ्या सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) बेंचवरच्या खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी देण्याची शक्यता आहे. बांगलादेशमध्ये मोठ्या संघांना धक्का देण्याची क्षमता आहे. पण टीम इंडियाचा सध्याचा फॉर्म बघता बांगलादेशला भारताचं आव्हान सोप नसणार. 


शमी-सूर्यकुमारला संधी मिळणार?
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियाच्या प्लेईंग XI मध्ये बदल करण्याची शक्यता आहे. भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज  मोहम्मद शमीला (Mohammed Shami) विश्वचषकात एकाही सामन्यात संधी मिळालेली नाही. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शमीने दमदार कामगिरी केली होती. फलंदाजीत मिस्टर 360 अर्थात सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची शक्यता आहे. श्रेयस अय्यरच्या जागेवर सूर्याला संधी मिळण्याची शक्यता आहे. 


बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड असलं तरी बांगलादेशला हलक्यात घेण्याची चूक भारतीय संघ करणार नाही. बांगलादेशमध्ये बलाढ्य संघाना मात करण्याती क्षमता आहे. याआधी अफगाणिस्तानने इंग्लंडवर तर नेदरलँडने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर मात करत विश्वचषकातील धक्कादायक निकालाची नोंद केली आहे. त्यामुळे टीम इंडिया प्रत्येक पाऊल जपून उचलेल हे नक्की. 


बांगलादेशविरुद्ध भारताची संभाव्य प्लेईंग XI
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव/ श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.