पाकिस्तान संघाला धक्का! बाबर आझमचं कर्णधारपद जाणार? `हा` खेळाडू नवा कर्णधार
ICC World Cup 2023 : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर त्यांच्या देशात चोहोबाजूंनी टीका होतेय. सामान्य क्रिकेट चाहत्यांबरोबर माजी क्रिकेटपटूंनीही पाकिस्तान संघावार निशाणा साधला आहे.
ICC World Cup 2023 Pakistan Squad : पाकिस्तान क्रिकेट वर्तुळात सध्या मोठं वादळ सुरु आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टीम इंडियाने (Team India) बाबर आझमच्या (Babar Azam) पाकिस्तान संघाला 7 विकेटने धुळ चारली. 14 ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) खेळवण्यात आलेल्या या सामन्यात पाकिस्तानला पहिली फलंदाजी करताना केवळ 191 धावा करता आल्या होत्या. कर्णधार बाबार आझमने 50 धावा केल्या. विजयाचं हे लक्ष टीम इंडियाने सात विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. टीम इंडियाचा कर्धणार रोहित शर्माने पाकिस्तानी गोलंदाजांची पिसं काढत अवघ्या 63 चेंडूत 86 धावा केल्या. यात त्याने सहा षटकार लगावले.
रोहित-बाबरची तुलना
या सामन्यानंततर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यात तुलना होऊ लागली आहे. इतकंच काय तर या पराभवानंतर बाबार आझमच्या कर्णधारपदावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. बाबर आझमच्या कर्णधारपदावरु पाकिस्तानच्याच माजी क्रिकेटपटूंमध्ये वादा रंगलाय. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने वर्ल्ड कपनंतर बाबर आझम राजीनामा देण्याची शक्यता असून शाहिन आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेट संघाचा नाव कर्णधार म्हणून नियुक्ती केली जावी असं म्हटलं आहे. याला पाकचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद युसूफने प्रतित्त्युतर दिलं आहे.
शाहिन आफ्रिदी योग्य कर्णधार
एका मुलाखतीत बोलताना शोएब मलिकने शाहीन आफ्रिदीला व्हाईट बॉल क्रिकेटचा नवा कर्णधार बनवावं असं वक्तव्या केलंय. पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्सचं नेतृत्व करताना शाहिन आफ्रिदीची आक्रमक झलक दिसली होती. बाबर आझम खेळाडू म्हणून सर्वोत्तम आहे, संघासाठी तो एक उपयुक्त खेळाडू आहे. पण कर्णधार म्हणून तो आपली छाप उमटवण्यात अपयशी ठरल्याचं शोएब मलिकने म्हटलंय. एशिया कप 2023 मध्येही बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची कामगिरी अत्यंत्य निराशाजनक झाली होती. भारताने पाकिस्तानाच तब्बल 228 धावांनी पराभव केला होता. शिवाय श्रीलंकेनेही पाकिस्तानला अस्मान दाखवलं. त्यानंतर आता विश्वचषकातही बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाची सुमार कामगिरी होतेय त्यामुळे शोएब मलिकने टीका केली आहे.
तिसऱ्या विश्वचषकात यश
दुसरीकडे पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज मोहम्मद युसूफने बाबर आझमची बाजू घेतली आहे. इमरान खान हे 1983 विश्वचषकात पाकिस्तानचे कर्णधार होते, 1987 विश्वचषकातही त्यांनी पाकिस्तानचं नेतृत्व केलं. पण कर्णधार म्हणून त्यांना 1992 विश्वचषकात विजय मिळला. त्यामुळे बाबर आझमलाही वेळ द्यायला हवा असं युसूफ यांनी म्हटलंय. काही स्पर्धांच्या कामगिरीवरुन निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचंही मोहम्मद युसूफ यांनी सांगितलं.
टी20 वर्ल्ड कपचं जेतेपद
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने 2021 मध्ये टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतावर 10 विकेटने मात केली होती. टी20 आणि एकदिवसीय विश्वचषकातील पाकिस्तान संघाचा भारताविरुद्ध हा एकमत्रा विजय आहे. 2022 च्या टी20 विश्वचषकात बाबर आझमने पाकि्सतान संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेलं. अंतिम सामन्यात इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला.