ICC T20I Ranking : टीम इंडियाने 17 वर्षानंतर टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर नाव कोरलं. टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाच्या प्रवासात सर्वात महत्त्वाचा वाटा राहिला तो ऑलराऊंडर हार्दिक पांड्याचा... (Hardik Pandya) हार्दिकने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विरोधी संघाला गुडघ्यावर टेकवलं. अशातच वर्ल्ड कप 15 दिवस देखील झाले नाहीत, तोपर्यंतच हार्दिक पांड्याला धक्का बसलाय. गेल्या 15 दिवसात हार्दिक पांड्या एकही टी-ट्वेंटी सामना खेळला नाही. त्यामुळे हार्दिक पांड्याला जोर का झटका लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पांड्याला धक्का बसलाय तो आयसीसीकडून... होय, नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसी रँकिंगमध्ये हार्दिक पांड्याच्या रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. आपल्या भेदक कामगिरीच्या जोरावर हार्दिक पांड्याने आयसीसी टी-ट्वेंटी ऑलराऊंडर रँकिंगमध्ये अव्वल स्थान मिळवलं होतं. अशातच आता हार्दिक पांड्याच्या रँकिंगमध्ये घसरण झाली असून तो क्रमांक 2 वर आला आहे.


पहिल्या क्रमांकावर कोण?


हार्दिक पांड्याकडून पहिलं स्थान निसटलं असलं असताना आता श्रीलंकेचा ऑलराऊंडर वानिंदु हसरंगा याने बाजी मारली आहे. 222 पाईंट्ससह हसरंगाने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर हार्दिक पांड्याच्या खात्यात 213 पाईंट्स आहेत. तर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मार्कस स्टॉयनिस आहे. त्याच्याकडे 211 गुण आहेत. तर झिब्बॉब्वेचा सिकंदर रझा देखील या यादीत चौथ्या स्थानावर आहे.


हार्दिक पांड्याने टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये 8 सामन्यात 11 विकेट घेतल्या आहेत. गोलंदाजांच्या क्रमवारीत हार्दिक पांड्या 56 व्या स्थानावर कायम आहे. तर फलंदाजीत हार्दिकने विश्वचषकात 8 सामन्यात 144 धावा केल्या होत्या. या 144 धावा टीम इंडियासाठी खऱ्या अर्थाने गेमचेंजर ठरल्या.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पांड्या आपल्या खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या कसोटी संघाचा भाग असेल तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियात विजय मिळवू शकते आणि नंतर WTC चे विजेतेपद देखील जिंकू शकते, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता पांड्या टेस्ट क्रिकेट खेळणार का? असा सवाल विचारला जातोय.