मुंबई : आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेत (Icc World Test Championship 2021-23) पाकिस्तान क्रिकेट टीमने (Pakistan Cricket Team)  टीम इंडियाला (Team India) पछाडलं आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला मागे टाकत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर अव्वल स्थानी श्रीलंका कायम आहे. पाकिस्तानने बागंलादेशचा पहिल्या कसोटीवर 8 विकेट्सने विजय मिळवला. पाकिस्तानसला या विजयाचा फायदा हा या डबल्यूटीसीच्या पॉइंट्स टेबलमध्ये (Wtc Points table) झाला. (icc world test championship 2021 23 pakistan cricket team overtake team india in points table after beat bangladesh)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने 2 सामने जिंकले तर 1 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानच्या नावे आता 24 पॉइंट्स आहेत. तर टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. मात्र 2 सामने ड्रॉ राखण्यात यश आले आहे. तर 2 मॅच जिंकल्या आहेत. टीम इंडियाच्या नावे एकूण 30 पॉइंट्स आहेत.


श्रीलंका अव्वल स्थानी 


श्रीलंका आतापर्यंत खेळलेला एकमेव सामना जिंकून 12 गुणांसह  अव्व्ल स्थानी आहे. तर पॉइंट्सच्या बाबतीत टीम इंडिया अव्वलस्थानी आहे. पण विजयी टक्केवारीबाबतीत श्रीलंका पहिल्या आणि पाकिस्तान दुसऱ्या स्थानी आहे. टीमची रँकिंग ही गुणांच्या टक्केवारीच्या निकषानुसार निश्चित होणार आहे. 


श्रीलंकाची गुणांची टक्केवारी ही 100, पाकिस्तानची 66.66 तर टीम इंडियाची 50 टक्के इतकी आहे. पाकिस्तानची गुणांची टक्केवारी ही बांगलादेशवर विजय मिळवण्याआधी 50 टक्के इतकी होती. तेव्हा पाकिस्तान तिसऱ्या स्थानी होती.