ऑस्ट्रेलियाच्या विजयाने WTC Points Table मध्ये मोठा उलटफेर; टीम इंडियाची चिंता मात्र वाढली
ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Points Table) च्या सत्रामध्ये टीम इंडियासोबत (Team India) पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेच्या (Sri Lanka) चिंतेत भर पडली आहे. बघूयात ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या सामन्यामुळे WTC Points Table वर नेमका काय परिणाम झाला आहे.
WTC Points Table: ऑस्ट्रेलिया विरूद्ध वेस्ट इंडिज (Australia vs West Indies) यांच्यामध्ये सध्या टेस्ट सिरीज सुरु होती. ऑस्ट्रेलियाने ही सिरीज जिंकली 2-0 अशी जिंकली आहे. दुसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा पराभव केला. ऑस्ट्रेलियाने 419 रन्सने वेस्ट इंडिजला नमवलं आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 (WTC Points Table) च्या सत्रामध्ये टीम इंडियासोबत (Team India) पाकिस्तान (Pakistan) आणि श्रीलंकेच्या (Sri Lanka) चिंतेत भर पडली आहे. बघूयात ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिजच्या सामन्यामुळे WTC Points Table वर नेमका काय परिणाम झाला आहे.
WTC Points Table मध्ये टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
वेस्ट इंडिजविरूद्धच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या विजयाने या टीमने पॉईंट्स टेबलमधील बादशाहत कायम ठेवली आहे. या सत्रामध्ये कांगारूंनी एकूण 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 8 सामन्यांमध्ये त्यांनी विजय मिळवला आहे. परिणामी यामुळे परसेंटेज पॉईंट्समध्ये ऑस्ट्रेलिया 75 अंकांवर असून सर्वात पुढे आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून श्रीलंक आणि भारत अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
टीम इंडियाने आतापर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सत्रामध्ये 12 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये 6 सामन्यांमध्ये त्यांनी विजयाची नोंद केलीये. जर टीम इंडियाला फायनलमध्ये जागा पक्की करायची असेल तर त्यांना बांगलादेशाविरूद्ध होणाऱ्या दोन्ही टेस्ट आणि ऑस्ट्रेलियामध्ये होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसोबत सर्व 4 सामने जिंकावे लागणार आहेत. याशिवाय भारताला श्रीलंकेच्या कामगिरीवरही लक्ष ठेवावं लागणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा 419 रन्सने विजय
वेस्ट इंडिज विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या सामन्यानमध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत मार्नस लबुशेन आणि ट्रेविस हेडने शतकं पूर्ण केली. पहिल्या डाव्यात 7 विकेट्स गमावून कांगारूंनी 511 रन्स करत डाव घोषित केला. ज्यानंतर वेस्ट इंडिज पहिल्या डावामध्ये अवघ्या 214 रन्समध्ये ऑलआऊट झाली. यावेळी ऑस्ट्रेलियाने 279 रन्सची अभेद्य आघाडी घेतली होती. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव 199 रन्सवर घोषित केला.
यावेळी वेस्ट इंडियला 497 रन्सचं लक्ष्य देण्यात आलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची टीम 77 रन्सवर पत्त्यांसारखी कोसळली. अखेरीस हा सामना ऑस्ट्रेलियाने 419 रन्सच्या अंतराने जिंकून घेतला.