मुंबई : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा (Australia vs Pakistan 3rd Test) तिसऱ्या कसोटीच्या पाचव्या दिवशी 115 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने 3 सामन्यांची मालिका 1-0 अशा फरकाने जिंकली. ऑस्ट्रेलियाची या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची दावेदारी आणखी मजबूत झालीय.मात्र या पराभवाचा पाकिस्तानला मोठा फटका बसलाय. मात्र पाकिस्तानचा हा पराभव टीम इंडियाच्या पथ्यावर पडलाय. पाकच्या पराभवामुळे टीम इंडियाला चक्क फायदा झालाय. (icc world test chmpionship points tables australia beat pakistan by 115 runs in 3rd test match)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाने पराभव केल्याने पाकिस्तानची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. तर टीम इंडियाला एका क्रमांकाचा फायदा झाल्याने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. 
 
आयसीसीने या वेळेस पॉइंट्स सिस्टममध्ये (ICC Test Championship Points Table) बदल केला आहे. या वेळेस मॅच जिंकल्यास विजयी संघाला 12 पॉइंट्स देण्यात येणार आहेत.


सामना टाय झाल्यास 6 तर ड्रा झाल्यास 4 पॉइंट्स मिळणार आहे. हे सर्व आकडेमोड झाली पॉइंट्सची. आता आपण पॉइंट्सची टक्केवारी जाणून घेऊयात. सामना जिंकल्यावर 100, टाय झाल्यावर 50 आणि ड्रॉ झाल्यास 33.33 तर इतके टक्के पॉइंट्स मिळतील.