नवी दिल्ली : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने आपल्या क्रिकेट करिअर संदर्भात एक मोठी घोषणा केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅप्टन विराट कोहलीने म्हटले आहे की, आपण आणखीन कमीत-कमी १० वर्ष तरी क्रिकेट खेळू शकतो. फिटनेस चांगला असला तर क्रिकेट नक्कीच खेळेल असा विश्वास विराटने व्यक्त केला आहे.


विराट कोहलीचं वय आता २९ वर्ष आहे. तो गेली ९ वर्ष क्रिकेट खेळत आहे. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यातील वन-डे सीरिजमध्ये विराटने दोन सेंच्युरी झळकावल्या. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन रिकी पाँटींग याच्या ३० सेंच्युरीची बरोबरी केली. सर्वाधिक सेंच्युरी करणाऱ्यांच्या यादीत विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर अव्वल स्थानी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (४९ सेंच्युरी) आहे.


विराट कोहलीने म्हटले की, प्रदर्शनातील सुधार यासाठीच माझा प्रयत्न असतो. अनेक लोकांना हे सुद्धा माहिती नाही की आम्ही दररोज किती मेहनत करतो. सर्वच प्लेयर खूप मेहनत घेतात आणि ट्रेनिंगही पूर्ण करतात. आम्ही काम पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत घेतो.