Asia Cup 2023 : पावसामुळे फायनल सामना रद्द झाला तर...; `या` टीमला सोपवली जाणार ट्रॉफी
Asia Cup 2023 Final: फायनलच्या ( Asia Cup 2023 Final ) दिवशीही पाऊस अडथळा ठरला तर आशिया कप 2023 ची ट्रॉफी कोणत्या टीमला दिली जाणार हा प्रस्न चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घेऊया असं झालं तर कोणत्या टीमला विजयी घोषित केलं जाणार आहे.
Asia Cup 2023 Final: एशिया कपमध्ये 17 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका ( India vs Sri Lanka ) यांच्यात सामना रंगणार आहे. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडिया ( Team India ) यंदा एशिया कप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. दरम्यान यावेळी एशिया कपच्या सर्वच सामन्यांवर पावसाचा परिणाम झाला आहे.
आता मिळालेल्या माहितीनुसार, एशिया कपच्या फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. अशा परिस्थितीत फायनलच्या ( Asia Cup 2023 Final ) दिवशीही पाऊस अडथळा ठरला तर आशिया कप 2023 ची ट्रॉफी कोणत्या टीमला दिली जाणार हा प्रस्न चाहत्यांच्या मनात आहे. जाणून घेऊया असं झालं तर कोणत्या टीमला विजयी घोषित केलं जाणार आहे.
काय सांगतो हवामानाचा रिपोर्ट?
आशिया कप 2023 चा फायनल ( Asia Cup 2023 Final ) सामना 17 सप्टेंबर रोजी रंगणार आहे. दरम्यान तिथल्या हवामान खात्याच्या अहवालानुसार, 17 सप्टेंबर रोजी पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावेळी पाऊस हा थोड्या थोड्या वेळाने व्यत्यय आणण्याची शक्यता आहे. 17 तारखेला पावसाची शक्यता 80 टक्के आहे. त्याचप्रमाणे वारे ताशी 18 किलोमीटर वेगाने वाहणार आहेत.
कसं ठरणार विजेता कोण?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2023 चा अंतिम सामना कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर (RPS) दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. अशा स्थितीत या सामन्यात संध्याकाळी 7 वाजेपर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे रविवार 17 सप्टेंबर रोजी हा सामना होऊ शकला नाही तर सोमवार 18 सप्टेंबर हा रिझर्व्ह डे म्हणून ठेवण्यात येणार आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्याचा निकाल रिझर्व्ह डेला म्हणजेच 18 सप्टेंबर रोजी लागला नाही तर अशा परिस्थितीत दोन्ही टीम्सना संयुक्त विजेता घोषित केलं जाणार आहे. आशिया कप 2023 च्या अंतिम सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी, भारत आणि श्रीलंका टीम्सना प्रत्येकी 20-20 ओव्हर्स खेळावे लागणार आहेत.
श्रीलंका-भारत यांचा कसा आहे रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत 166 वनडे सामने खेळले गेलेत. ज्यामध्ये भारतीय टीमचा वरचढ ठरताना दिसतेय. टीम इंडियाने 97 सामने जिंकलेत. तर श्रीलंकेने 57 सामने जिंकलेत. यामध्ये 11 सामन्यांचा निकाल लागलेला नाही. आशिया कपचा इतिहास पाहिला तर भारताने एकूण 7 वेळा विजेतेपद पटकावलंय.