World Cup 2023: सेमीफायनलच्या सामन्यात पाऊस पडला तर...; `या` टीमला मिळणार फायनलचं तिकीट, पाहा कसं आहे समीकरण!
What if rain washed out semi finals?: गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
What if rain washed out semi finals?: वर्ल्डकपमध्ये आता सेमीफायनलचं संपूर्ण चित्र क्लियर झालं आहे. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पहिला सामना 15 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. मात्र यावेळी चाहत्यांना चिंता एका वेगळ्याच गोष्टीची आहे. गेल्यावेळीही भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यात सेमीफायनलचा सामना खेळवण्यात आला होता. मात्र त्यावेळी पावसाने व्यत्यय आणला होता. असंच यंदाही जर पावसाने खोडा घातला तर फायलनचं तिकीट कोणाला मिळणार?
भारत विरूद्ध न्यूझीलंडच्या सामन्याचं काय होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात किंवा 16 नोव्हेंबर रोजी कोलकातामध्ये होणार्या दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यात सतत पाऊस पडला तर तो सामना रिझर्वह डेला पूर्ण होईल.
यंदाच्या वर्ल्डकपमध्येही आयसीसीने सेमीफायनलच्या दोन्ही सामन्यांसाठी प्रत्येकी एक दिवस राखीव दिवस ठेवला आहे. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात 15 नोव्हेंबरला पाऊस पडला तर तो सामना १६ नोव्हेंबरला खेळवला जाईल. तर 16 नोव्हेंबरलाही पाऊस थांबला नाही आणि सामना पूर्ण झाला नाही, तर पॉईंट्स टेबलमध्ये वरच्या स्थानावर असलेल्या टीमला अंतिम फेरीत जाण्याची संधी देण्यात येणार आहे.
सध्या पॉईंट्स टेबल पाहिलं तर टीम इंडिया सर्वाधिक 16 पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, नेदरलँडविरुद्ध भारताचा एक सामना बाकी आहे. जर टीम इंडियाने हा सामना जिंकला तर त्याचे एकूण 18 पॉईंट्स होतील आणि जरी हा सामना हरला तरीही टीम इंडिया पॉइंट टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर राहील.
दुसरीकडे न्यूझीलंडची टीम एकूण 10 पॉईंट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे रिझर्व्ह डेला देखील पाऊस पडला तर टीम इंडिया थेट फायनलसाठी पात्र ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यालाही रिझर्व्ह डे
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनलच्या सामन्यात म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी पाऊस पडला तर तो सामना राखीव दिवशी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे. राखीव दिवशीही सामन्याचा निकाल कळला नाही, तर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल असणारी टीम अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहे.
मात्र यावेळी दोन्ही टीम्सचे पॉईंट्स 14-14 आहे. अशा परिस्थितीत दक्षिण आफ्रिकेची टीम अंतिम फेरीत पोहोचेल कारण पॉईंट्स टेबलमध्ये ची दुसऱ्या स्थानावर आहे आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या चांगल्या नेट रनरेटमुळे ते ऑस्ट्रेलियापेक्षा अधिक असल्याने याचा फटका कांगारूंना बसू शकतो.