Rohit Sharma: मला टी-20 WC मध्ये निवडणार असाल तर...; अखेर BCCI ला रोहित स्पष्टच म्हणाला!
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकप नंतर झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांसोबत कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड देखील जोडले गेले होते. यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) बीसीसीआय अधिकाऱ्यांना टी-20 खेळण्याबाबत त्याचं मत स्पष्ट केलं आहे.
Rohit Sharma To BCCI Officials: वर्ल्डकपमध्ये भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. यानंतर आता बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांनी वर्ल्डकप 2023 मध्ये टीम इंडियाच्या ( Team India ) कामगिरीचा रिव्यू करण्यासाठी खास बैठक बोलवण्यात आली होती. याशिवाय या बैठकीमध्ये भविष्यात होणाऱ्या टीम इंडियाच्या ( Team India ) कार्यक्रमावर देखील चर्चा करण्यात आली.
कर्णधार रोहित शर्मा-कोच राहुल द्रविड देखील बैठकीत
वर्ल्डकप नंतर झालेल्या या बैठकीमध्ये बीसीसीआयच्या ( BCCI ) अधिकाऱ्यांसोबत कर्णधार रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड देखील जोडले गेले होते. यावेळी टीम इंडियाचा ( Team India ) कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) बीसीसीआय अधिकाऱ्यांना टी-20 खेळण्याबाबत त्याचं मत स्पष्ट केलं आहे.
एक वृत्तपत्राच्या रिपोर्टमध्ये, या बैठकीत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्याचा हवाला देत असं नमूद करण्यात आलं होतं की, रोहित शर्माने ( Rohit sharma ) बोर्डाच्या सदस्यांना सांगिलंय, जर तुम्हाला टी-20 वर्ल्डकपसाठी माझी निवड करायची असेल तर त्यासंबंधी आताच मला माहिती द्या.
रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयच्या ( BCCI ) या बैठकीत असलेले सर्व अधिकारी, निवडकर्ते आणि कोच राहुल द्रविड यांनी एकमताने रोहित शर्माला टी-20 वर्ल्डकपच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाही तर निवडकर्त्यांची अशीही इच्छा होती की, दक्षिण आफ्रिकेविरूद्ध जी टी-20 सिरीज होणार आहे, तेव्हापासूनच रोहितने कर्णधारपदाची धुरा सांभाळावी. मात्र रोहित शर्माने काही काळ विश्रांती मागितली आहे.
बीसीसीआयची ( bcci ) ही रिव्यू मिटींग नवी दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आली होती. रोहित शर्मा या मिटींगमध्ये व्हिडीओ कॉन्फ्रेंसद्वारे सहभागी झाला होता.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-20 सिरीजमध्ये खेळणार नाही हिटमॅन
गेल्या काही दिवसांपूर्वी अशा बातम्या समोर येत होत्या की, बीसीसीआय रोहित शर्माची टी-20 च्या कर्णधारपद भूषवण्यासाठी मनधरणी करणार आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजपूर्वी रोहित शर्माने काही काळाची विश्रांती मागितली. रोहित दक्षिण आफ्रिकेविरूद्ध टी-20 सिरीज खेळणार नसून टेस्ट सिरीजमध्ये मात्र त्याचा सहभाग असणार आहे.