मुंबई :  भारत, श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात श्रीलंकेत होणारी त्रिकोणीय मालिका मंगळवारपासून सुरू होत आहे. टी-२० निडास ट्रॉफीचे सामने भारतात जिओ टीव्हीवर पाहता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिओवर पहिल्यांदा लाइव्ह मॅच पाहायला मिळणार आहेत. यापूर्वी जिओवर २०१८ विंटर गेम आणि ईएफएल कप दाखविण्यात आला होता. जिओ टीव्हीने निदास ट्रॉफीचे भारतातील डिजिटल प्रसारणाचे हक्क विकत घेतले आहेत. 



जिओ टीव्हीने दिलेल्या माहितीनुसार ही त्रिकोणीय मालिकेचे कॉम्प्रेंसिव्ह कव्हरेज हक्क मिळविले आहेत. जिओच्या माध्यमातून अधिकाधिक भारतीयांपर्यंत ही मालिका पोहचविण्याचा उद्देश आहे. तसेच आपले अॅप अधिक पॉप्युलर करण्याचा हा प्रयत्न आहे. 


या सिरीजचा पहिला सामना भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. आठ मार्चला भारत बांगलादेशशी भिडणार आहे. १२ मार्चला पुन्हा भारत आणि श्रीलंकेत सामना होणणार आहे. तर १४ मार्चला भारत-बांगलादेशमध्ये दुसरा सामना होणार आहे. फायनल सामना १८ मार्चला खेळविण्यात येणार आहे.