Asia Cup 2023 : एशिया कपला 2023 ( Asia Cup 2023 ) ला सुरुवात झाली असून पहिला सामना पाकिस्तान विरूद्ध नेपाळ यांच्यात खेळवण्यात आला. पाकिस्तानने या सामन्यात प्रथम फलंदाजी करत 342 रन्स केले. मात्र यावेळी मोहम्मद रिझवानच्या विकेटवरून एकच चर्चा होताना दिसतेय. या सामन्यात रिझवानने स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेतलाय. रिझवान ज्या पद्धतीने रन आऊट झाला त्यावरून आता त्याला ट्रोल करण्यात येतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात मोहम्मद रिझवानने ( Mohammad Rizwan  ) 44 रन्स केले. यावेळी रिझवान रनआऊट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये रिझवान फार सुस्तपणे आणि बेजबादारपणे आऊट झाल्याचं दिसून येतंय. दरम्यान यानंतर रिझवान ( Mohammad Rizwan  ) चाहत्यांनी सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल केलं आहे.  


विचित्र पद्धतीने आऊट झाला Mohammad Rizwan 


पाकिस्तान क्रिकेट टीमने एशिया कपच्या (Asia Cup 2023) पहिल्याच सामन्यात तुफान फलंदाजी केली. हा एशिया कप पाकिस्तानसाठी महत्त्वाचा मानला जातोय कारण याचं आयोजन पाकिस्तानात करण्यात आलं आहे. पहिल्याच सामन्यात पाकिस्तानची उत्तम फलंदाजी पहायला मिळाली. मात्र रिझवानकडून एक चूक झाली. 



या सामन्यात विकेटकीपर फलंदाज मोहम्मद रिझवान विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. झालं असं की, लामिछानेच्या ओव्हरमध्ये रिझवानने ( Mohammad Rizwan  ) पॉइंटवर बॉल खेळला आणि एक सिंगल रन घेण्यासाठी धावला. यावेळी रिझवानला असं वाटलं की, तो एक रन सहज पूर्ण करेल.


मात्र बेफिकीर आणि आळशी पणाचा त्याला चांगलाच फटका बसला. यावेळी तो विकेट्सच्या दरम्यान हळू धावाला आणि विकेट गमावून बसला. यावेळी दीपेंद्र सिंगने उत्तम पद्धतीने थ्रो करत रिझवानला ( Mohammad Rizwan  ) माघारी धाडलं. रिप्लेमध्ये असे दिसून आलं की, रिझवानने बॅट ड्रेक केली नाही आणि त्याचे संपूर्ण शरीर हवेमध्ये होतं. दरम्यान रिझवानच्या रनआऊटनंतर चाहते त्याच्यावर प्रचंड नाराज झाले आहेत.