मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा आऊट ऑफ फॉर्म अजूनही कायम आहे.  कारण इंग्लंडविरूद्धच्या टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या मालिकेत विराट अक्षरश फ्लॉप ठरलाय.  त्यामुळे आता इतका दिग्गज खेळाडू सतत अपयशी होत असल्याने आता त्याच्या टी20 विश्वचषकाच्या निवडीवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरूद्धच्या टेस्ट सामन्यात विराट काही खास कामगिरी करू शकला नव्हता. टेस्ट नंतर आता त्याला टी20 सामन्यात संधी देण्यात आली होती. मात्र टी20 सामन्यात ही तो फ्लॉप ठरला आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात विराट 3 बॉल्समध्ये 1 धावा करून तो बाद झाला आहे.  इंग्लंड संघातून पदार्पण करणाऱ्या रिचर्ड ग्लीसन या नवख्या गोलंदाजाचा शिकार विराट ठरला होता. 


तर आजच्या तिसऱ्या टी20 सामन्यातही त्याची बॅट चालली नाही. 6 बॉलमध्ये 11 धावा करून तो बाद झाला. टीम इंडियासमोर असलेल्या मोठ्या स्कोर पाठलाग करण्यासाठी विराटकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा होती. मात्र याही सामन्यात तो फ्लॉप ठरला. त्यामुळे विराटच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.