IND vs AUS, 1st T20I : टीम इंडिया - ऑस्ट्रेलियातला पहिला टी20 सामना कधी आणि कुठे पाहता येणार, जाणून घ्या
कधी, किती वाजता, आणि कोणत्या चॅनेलवर पाहता टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियातला पहिला टी20 सामना?
मोहाली : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS, 1st T20I) यांच्यात मंगळवारी 20 सप्टेंबरला पहिला टी20 सामना खेळवला जाणार आहे. हा सामना आगामी टी20 वर्ल्डकपच्या दृष्टीने खुप महत्वाचा ठरणार आहे. त्यामुळे संपुर्ण क्रिकेट वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये (IND vs AUS) 20 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबरला होणार आहे. हा सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियम, मोहाली येथे होणार आहे.
या सामन्यासाठी रोहित शर्मा (Rohit sharma) आपल्या ताकदवान संघासह मैदानात उतरणार आहे. तर हर्षल पटेल सारखा घातक बॉलर्स टीम इंडियात परतला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी ही धोक्याची घंटा असणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ अॅरॉन फिंचच्या (Aaron finch) नेतृत्वाखालील मैदानात उतरणार आहे. या संघात स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा सारखे दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळे टीम इंडियासाठी ऑस्ट्रेलिया मोठं आव्हान ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान हे सामने कधी, कुठे आणि किती वाजता पाहता येणार आहेत. हे जाणून घेऊयात.
कुठे रंगणार हा सामना?
मोहालीच्या पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (Punjab Cricket Association Stadium) आयएस बिंद्रा स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे.
किती वाजता सुरु होणार सामना?
सामन्याचे नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होणार आहे. आणि पहिला बॉल संध्याकाळी 7:30 वाजता टाकला जाईल.
कुठे पाहता येणार?
या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स (Star sports) नेटवर्कवर होणार आहे. तसेच डिस्ने+ हॉटस्टार (Disney + Hotstar) आणि वेबसाइट या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहे.
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (विकेटकिपर), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल , भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह
ऑस्ट्रेलिया संघ : अॅरॉन फिंच (कर्णधार), शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा