IND vs AUS 2nd ODI:  भारत विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने (Australia vs India) टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. विशाखापट्टणम (Visakhapatnam) येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने दिलेलं 118 धावांचं आव्हान आटोपताना भारताची भंबेरी उडाली. त्यामुळे टीम इंडियाला 10 गडी राखून पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे  टीम इंडियाच्या पराभवाची कारणं कोणती? टीम इंडियाचं नेमकं काय चुकलं? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. (IND vs AUS 2nd odi team india loss five reasons in Visakhapatnam latest sports news)


स्टार्कचा कहर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर मिचेल स्टार्क समोर (Mitchell Starc) भारतीय टॉप ऑर्डर पुन्हा एकदा फ्लॉप गेली. स्टार्कने या सामन्यात 5 विकेट मिळवल्या. नव्यांदा त्याने 5 विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. मिचेल स्टार्कच्या घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केएल राहुल (KL Rahul) फेल झाल्याचं दिसून आलंय.


अभ्यास पडला कमी


मागील सामन्यात टीम इंडियाने स्टार्कच्या गोलंदाजीसमोर नांग्या टाकल्या होत्या. दुसऱ्या सामन्याप्रमाणे पहिल्या सामन्यात देखील सलामीवीर फेल ठरले तर मिडल ऑर्डर देखील स्टार्कसमोर कमकूवत दिसून आली. त्यावर अभ्यास करणं गरजेचं होतं. मात्र, टीम इंडियाने त्याच चुका केल्या.


ढिल्ली गोलंदाजी


ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड धडाकेबाज फलंदाजी धुंवाधार फलंदाजी केली. मिचेल स्टार्कने पाच बळी मिळवल्यानंतर फक्त 117 धावांचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड यांनी नाबाद भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला. भारताला एकही विकेट मिळवता आली नाही. संघाच्या ढिल्ल्या गोलंदाजीचा परिणाम दिसून आला.


सूर्या-राहूल फेल


टॉप ऑर्डर फेल झाली तर सर्वात महत्त्वाचं असतं ते मिडल ऑर्डरचा खेळ. शुभमन गिल झटपट बाद झाल्याने सूर्या राहूल टिकून राहणं फायद्याचं ठरलं असतं. मात्र या दोन्हीपैकी एकही फलंदाज मैदानात टीकला नाही. एकीकडे विराट मैदानात असताना एक खमका खेळाडू मैदानात हवा होता.


आणखी वाचा - Suniel Shetty On KL Rahul: मॅचविनर जावई पुन्हा फेल; पण सासरेबुवा म्हणतात...


गोलंदाजांचे प्रयोग फसले...


खूप कमी स्कोर असताना गोलंदाजीमध्ये प्रयोग करणं गरजेचं असतं, असं क्रिडातज्ज्ञ सांगतात. रोहितने हार्दिक पांड्याला प्रथम संधी देणं गरजेचं होतं, असं काहींचं मत आहे. तर फिरकीचा प्रयोग आधी केला गेला असता तर भारताच्या अपेक्षा आणखी टिकून राहिल्या असत्या, असंही काहीजण म्हणत आहेत.