IND vs AUS 3rd ODI Free Live Streaming: एकदिवसीय वर्ल्डकपचं घोडेमैदान फार दूर नाही. 5 ऑक्टोबर 2023 पासून वर्ल्डकपचे सामने खेळवले जाणार आहेत. या अत्यंत महत्त्वाच्या स्पर्धेआधी भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिले 2 सामने भारताने जिंकले आहेत. मात्र असं असलं तरी भारतासाठी शेवटचा सामना हा विजयाबरोबरच संघात कोणाला आणि कसं खेळवलं जाणार यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळेच वर्ल्डकपआधी आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात परफेक्ट प्लेइंग इलेव्हन आजमावण्याची शेवटची संधी कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघ व्यवस्थापनाकडे राजकोटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये मिळणार आहे. त्यामुळेच भारतीय क्रिकेट चाहत्यांचंही मालिकेत 2-0 आघाडी मिळवली असली तरी विशेष लक्ष असेल.


भारतासाठी सामना महत्त्वाचा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताने मोहालीमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये प्रथम गोलंदाजी करत धावांचा पाठलाग करताना 5 विकेट्स आणि 8 चेंडू राखून विजय मिळवला. तर इंदूरमध्ये झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 399 धावांचा डोंगर उभा केला आणि सामना 99 धावांनी खिशात घातला. या सामन्यांमध्ये भारताची गोलंदाजी आणि फलंदाजीही उत्तम झाली. या सामन्यांत भारताचं नेतृत्व के. एल. राहुलने केलेलं. वर्कलोड आणि आगामी विश्वचषक लक्षात घेता कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि कुलदीप यादव यांना पहिल्या 2 सामन्यांमध्ये आराम देण्यात आला होता. मात्र राजकोटच्या एकदिवसीय सामन्यामध्ये हे सर्व खेळाडू खेळणार आहेत. हा सामना वर्ल्डकप सुरु होण्याआधी संघ निश्चित करण्यासाठी शेवटची संधी असणार आहे. 


संघ निश्चित करण्यासाठी सामना अत्यंत महत्त्वाचा


भारताने 17 खेळाडूंचा भारतीय संघ वर्ल्डकपसाठी यापूर्वीच जाहीर केला आहे. मात्र यात बदल होण्याची दाट शक्यता आहे. अक्षर पटेल जायबंदी असून तो शेवटचा एकदिवसीय सामनाही खेळणार नाही. त्याच्या जागी वर्ल्डकपच्या संघात आर. अश्विन किंवा वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळू शकतं. सुंदरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. दुसरीकडे आर. अश्विनने दोन्ही एखदिवसीय सामन्यांमध्ये उत्तम गोलंदाजी केली. वर्ल्डकप स्पर्धेआधी राजकोटमधील सामना हा भारताचा शेवटचा सामना असेल. भारत मुख्य स्पर्धेआधी सराव सामने खेळणार आहे. मात्र या सामन्यांना फारसं महत्त्व नाही. त्यामुळेच शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जो संघ खेळणार आहे तोच 8 ऑक्टोबर रोजी वर्ल्डकप स्पर्धेमध्ये पहिल्या सामन्या खेळताना दिसू शकतो. हा सामनाही ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवला जाणार आहे.


कधी सुरु होणार सामना?


भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा सामना दुपारी दीड वाजल्यापासून सुरु होईल


कोणत्या वाहिनीवर दिसणार सामना?


हा सामना स्पोर्ट्स 18 या वाहिनीवर पाहता येईल.


कुठे होणार ऑनलाइन स्ट्रीमिंग?


भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानचा हा सामना जीओ सिनेमा अॅपवर लाइव्ह पाहता येणार आहे.


तिसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघ:


रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल (दुखापतीमधून बरा झाला तर), वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.


ऑस्ट्रेलियन संघ -


पॅट कमिन्स (कप्तान), सीन एबॉट, अॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, जोश इंग्लिश, स्पेन्सर जॉनसन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मैथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, अॅडम झॅम्पा.