IND vs AUS, 4th Test: क्रिकेटला (Cricket News) अनन्यसाधारण महत्त्वं आणि कमालीची लोकप्रियता मिळालेली असताना या खेळामुळं अनेक नवोदित चेहऱ्यांनाही प्रकाशझोतात आणलं. भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळालेल्या प्रत्येक खेळाडूनं संधीचं सोनं केलं पण, काहींच्या वाट्याला मात्र निराशाच आली. अशाच खेळाडूंमध्ये आता आणखी एका नावाची भर पडू शकते. कारण, आगामी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) या दोन्ही संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यातून एका खेळाडूला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदाबाद येथे border gavaskar trophy तील चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी हा निर्णय घेतला जाऊ शकतो. जिथं कर्णधार (Rohit Sharma) रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या विश्वासातील खेळाडू संघातून वगळला जाऊ शकतो. के.एल राहुलमागोमाग आता त्याच्यावरही हे संकट कोसळू शकतं. 


संघातून पत्ता कट... 


संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो असा हा खेळाडू आहे, केएस भरत. चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी संघातून त्याला वगळून (Ishan Kishan) ईशान किशनला संधी दिली जाऊ शकते. नागपूर, दिल्ली आणि इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये तो अपयशी ठरला आहे. इतकंच नव्हे, तर Wicket Keeping दरम्यानही त्याला काही अडचणींचा सामना करावा लागत होता. परिणामी आता हा निर्णय घेतला जाऊ शकतो. 


हेसुद्धा वाचा : IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये लागू होणार नवा नियम, चुरशीच्या सामन्यात फिरु शकतो निकाल


भरतची गाडी रुळावरून घसरली... 


इंदुरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यामध्ये भरतनं अवघ्या 17 आणि 3 धावाच केल्या होत्या. त्याच्या फलंदाजीतून प्रभावी कामगिरी पाहायला मिळालीच नाही. त्यावेळीच नेमकी संघाला ऋषभ पंत आणि ईशान किशनची उणीव भासली. त्यात मधल्या फळीत येणारा भरत सातत्यानं अपयशी ठरत असल्यामुळं संघाला त्या जागी आता एका तुफानी खेळाडूची गरज भासू लागली आहे. इतकंच नव्हे, तर Keeping करत असतानाही भरतला अपयश येत असल्यामुळं त्याचा फटका संघाला बसत आहे. त्यामुळं रुळावरून घसरलेली त्याची गाडी पुन्हा रुळावर आणण्यासाठी तूर्तास त्याला संघाबाहेर ठेवलं जाऊ शकतं. 


भरतऐवजी सध्याच्या घडीला संघासाठी ईशान किशन हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळं संघाकडून त्याला सहाव्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवणं हा योग्य निर्णय ठरेल. सोबतच किशन Wicket keeper म्हणूनही तितक्याच चपळाईनं कामगिरी करू शकतो. ज्यामुळं त्याला भरतची जागा मिळणं आता जवळपास निश्चितच झालं आहे.