IND VS AUS 4th Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीचा (Border Gavaskar Trophy) चौथा टेस्ट सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर 26 डिसेंबर पासून खेळवला जात आहे. या सामन्यात फलंदाजीच्या इनिंगमध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) यशस्वी जयस्वाल सोबत ओपनिंग करण्यासाठी उतरला. यापूर्वी झालेल्या दोन सामन्यांमध्ये रोहित मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजीसाठी उतरला होता. मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये बदल करून देखील रोहितच्या फॉर्ममध्ये सुधारणा झाली नाही. रोहित 5 बॉलमध्ये केवळ 3 धावा करून बाद झाला. या संपूर्ण सीरिजमध्ये आतापर्यंत रोहितने फक्त 19 धावा केल्या. फलंदाजीत येणार सततचं अपयश आणि वाईट फॉर्म इत्यादींमुळे रोहित त्याच्या टेस्ट करिअरशी संबंधित मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, टीम इंडियाच्या निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर सध्या मेलबर्नमध्ये आहेत आणि ते रोहित शर्मा सोबत त्याच्या टेस्ट क्रिकेटमधील भविष्याविषयी बोलू शकतात. भारतीय कर्णधार रोहित शर्माने मागील 8 टेस्ट सामन्यात 11.07 च्या सरासरीने 155 धावा केल्या आहेत. रिपोर्ट्समध्ये असे देखील म्हटले जातं आहे की, टीम इंडिया जर 2025 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साठी क्वालिफाय होऊ शकली नाही तर सिडनीमध्ये होणारी बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा 5 वा टेस्ट सामना हा रोहित शर्मासाठी शेवटचा सामना ठरेल. 


हेही वाचा : मेलबर्नच्या कसोटीत विराटचा तिसऱ्यांदा वाद, विकेट पडल्यानंतर प्रेक्षकांसोबतचा 'हा' व्हिडीओ पाहाच!



पीटीआयच्या रिपोर्टनुसार नेहमी भारताकडून ओपनिंग बॅट्समनची भूमिका निभावणार रोहित शर्मा मागील दोन टेस्ट सामन्यात मिडल बॉर्डरमध्ये फलंदाजी करताना चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळेच चौथ्या टेस्ट सामन्यात शुभमन गिलला प्लेईंग 11  मधून बाहेर करण्यात आले जेणेकरून रोहितला  ओपनिंग करण्यासाठी स्थान मिळू शकेल. चौथ्या टेस्टमध्ये टीम इंडियाची फलंदाजी सुरु झाल्यावर रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघे ओपनिंग फलंदाजीसाठी मैदानात उतरले. तर केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. 


टीम इंडिया मेलबर्न टेस्ट जिंकून शकली नाही तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपची फायनल गाठणं त्यांना अवघड होईल. सध्या टेस्ट सीरिज 1-1 अशा बरोबरीत आहे. परंतु जर टीम इंडियाने 3-1 अशा फरकाने ही सीरिज जिंकली तर ते थेट WTC फायनलसाठी क्वालिफाय होतील. पण जर हीच सीरिज 2-2 वर ड्रॉ झाली तर टीम इंडियाला दुसऱ्या संघांच्या परफॉर्मन्सवर अवलंबून राहावं लागेल. रिपोर्ट्सनुसार असं म्हटलं जातंय की जर टीम इंडिया WTC फायनलसाठी क्वालिफाय होऊ शकली नाही तर कर्णधार रोहित शर्मा टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होऊ शकतो. 


रोहित शर्मा क्रिकेट करिअर : 


रोहित शर्माने क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. टी 20 क्रिकेटमधून जुलै 2024 मध्ये निवृत्ती घेतल्यावर तो सध्या टीम इंडियाच्या वनडे आणि टेस्ट संघाचा कर्णधार आहे. रोहित शर्माने 67 टेस्ट सामन्यांमध्ये 4293 धावा केल्या. यात 1 द्विशतक, 12 शतकं आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. तर रोहित शर्माने वनडेमध्ये 265 सामने खेळले असून यात त्याने 10866 धावा केल्या. तर रोहितने टी 20 मध्ये 159 सामने खेळून यात त्याने 4231 धावा केल्या आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने 2024 चा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप देखील जिंकला आहे.