ब्रिस्बेन : भारताने (India) कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia ) त्यांच्या भूमित पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली आहे. (IND vs AUS Brisbane Test Day 5) टीम इंडियाने चौथ्या कसोटीत तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या कसोटीत सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (91), अनुभवी चेतेश्वर पुजारा (56) आणि तुफानी ऋषभ पंत (85 नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ही कसोटी जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


हिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 8 गड्याने विजय मिळवला. तर हनुमा विहारी आणि आर. अश्विन यांनी संयम आणि जिद्दीने फलंदाजी करत तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखला. चौथ्या कसोटी सामन्यात सांघिक खेळाच्या बळावर भारतीय संघाने विजय मिळवला.




ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 369 धावा केल्या आणि टीम इंडियाने प्रत्युत्तरात 336 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 33 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावा करत भारताला विजयासाठी 328 धावांचे आव्हान होते. टीम इंडियाने शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि ऋषभ पंत यांच्या फलंदाजीच्या जोरावर 328 धावांचे सहज गाठले.



शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांनी दुसऱ्या डावांत 9 बळी घेत ऑस्ट्रेलियाला 294 धावांवर रोखले. त्यानंतर भारतीय फलंदाजांनी आक्रमक आणि संयमी फंलदाजी करत विजय खेचून आणला. ब्रिस्बेन येथील गाबा मैदानावर भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.