मुंबई : पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाला 375 धावांचे विशाल लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने चांगली सुरुवात केली आणि पहिल्या विकेटसाठी मयंक अग्रवाल आणि शिखर धवन यांच्यात 53 धावांची भागीदारी केली पण मयंक 22 धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार विराट 21 धावांवर तर श्रेयस अय्यर 2 धावा करुन आऊट झाला. केएललाही काही खास कामगिरी करता आली नाही आणि त्याने केवळ 12 धावांचे योगदान दिले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानंतर हार्दिक पांड्याने धवनसह भारतीय डाव सांभाळला आणि त्यांच्याबरोबर पाचव्या विकेटसाठी 128 धावांची भागीदारी केली. त्यानंतर शिखर धवन देखील 74 धावांवर बाद झाला, पण हार्दिकने जबाबदारीने डाव पुढे चालू ठेवला. पण आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिले शतक त्याने चुकवलं. त्याने 76 बॉलमध्ये 7 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 90 धावा केल्या. हार्दिक पांड्याचा हा वनडे कारकिर्दीतील हा सर्वात मोठा डाव देखील ठरला.



हार्दिकने मोडला धोनीचा 12 वर्षांचा रेकॉर्ड


हार्दिक पंड्याने आपले पहिले वनडे शतक गमवले. पण त्याने धोनीला मागे सोडले. धोनीने ऑस्ट्रेलियामध्ये सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या होत्या.  पण आता हार्दिकने त्याला मागे टाकले आहे. धोनीने 2008 मध्ये कांगारू संघाविरूद्ध नाबाद 88 धावा केल्या होत्या. आता 12 वर्षानंतर हार्दिकने तो विक्रम मोडला आहे आणि आता ऑस्ट्रेलियामधील एकदिवसीय सामन्यात सहाव्या क्रमांकावर खेळताना भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याने बनवला आहे.


90 - हार्दिक पंड्या (2020)


88 - एमएस धोनी (2008)


75 - कपिल देव (1980)


भारताकडून 90 ते 100 धावांमध्ये आऊट होणारा सातवा खेळाडू


93 - मो अझरुद्दीन


93 - सचिन तेंडुलकर


90 - वीरेंद्र सेहवाग


91 - सचिन तेंडुलकर


92 - गौतम गंभीर


91 - गौतम गंभीर


91 - विराट कोहली


99 - रोहित शर्मा


90 - हार्दिक पांड्या