Ind Vs Aus : 9 फेब्रुवारीपासून टीम इंडियाला (Team India) ऑस्ट्रेलिया विरूद्ध 4 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळायची आहे. नागपूरमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा (Border–Gavaskar Trophy) पहिला सामना रंगणार असून टीम इंडिया या सिरीजच्या तयारीसाठी लागली आहे. गेल्या 3 वर्ष सलग बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभव करत पुन्हा एकदा हा खिताब आपल्या नावे करण्याच्या प्रयत्न करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान सिरीज सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने विकेटकीपर संदर्भात मोठे संकेत दिले आहेत. याशिवाय पहिल्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची माहिती घेऊया.


भारताच्या विकेटकीपरबाबत Rohit Sharma ने दिले संकेत


बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी केएस भरत (KS Bharat) ला टीम इंडियामध्ये संधी देण्यात आलीये. याशिवाय ईशान किशन (Ishan Kishan) लाही पहिल्यांदाच टेस्ट टीममध्ये सहभागी केलं आहे. भारतीय क्रिकेट प्रॅक्टिस सेशन दरम्यान काढलेला एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. यामध्ये रोहित शर्मा सराव सत्रात केएस भरतसोबत अनुभव शेअर करतोय. त्यानंतर असं बोललं जातंय की, पहिल्या टेस्ट सामन्यात केएस विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.


ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिल्या 2 टेस्टसाठी भारताची टीम 


रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मो. शमी, मो. सिराज, उमेश यादव, जयदेव उनादकट, सूर्यकुमार यादव.


भारताविरूद्ध ऑस्ट्रेलियाची टीम


पॅट कमिंस (कर्णधार), एश्टन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स केरी, कॅमरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, लांस मॉरिस, टोड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ (उपकप्तान), मिशेल स्वेपसन, डेविड वॉर्नर


ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा (टेस्ट सीरिज शेड्यूल):


पहिली टेस्ट- 9 ते 13 फेब्रुवारी, नागपुर
दूसरी टेस्ट- 17 ते 21 फेब्रुवारी, दिल्ली
तिसरी टेस्ट- 1 ते 5 मार्च, धर्मशाला
चौथी टेस्ट- 9 ते 13 मार्च, अहमदाबाद