IND vs AUS: जडेजा आणि पुजाराने रचला इतिहास; दुसऱ्या टेस्ट सामन्यात तब्बल 17 रेकॉर्ड्सची नोंद
टीम इंडियाला115 रन्सचं लक्ष्य मिळलं आणि 6 विकेट्सने भारताने कांगारूंचा पराभव केला. या विजयासह सामन्यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल 17 रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे.
IND vs AUS: 19 फेब्रुवारी रोजी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाला बॉर्डर गावस्कर सिरीजच्या (Border–Gavaskar Trophy) दुसऱ्या टेस्ट सामन्यामध्ये 6 विकेट्सने पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने या सिरीजमध्ये 2-0 अशी आघाडी देखील घेतली आहे. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियमवर रंगलेला दुसरा टेस्ट सामन्याचा निर्णय तिसऱ्याच दिवशी लागला. नागपूर टेस्ट सामन्यामध्येही कांगारूंवर अशीच काहीशी परिस्थिती ओढावली होती.
पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने 263 रन्स केले होते, ज्यानंतर भारताने पहिल्या डावात 262 रन्सचा पल्ला गाठला. 1 रनची आगाडी घेऊन ऑस्ट्रेलिया टीम पुन्हा मैदानात उतरली आणि अवघ्या 113 रन्सवर संपूर्ण टीम माघारी परतली. यावेळी टीम इंडियाला115 रन्सचं लक्ष्य मिळलं आणि 6 विकेट्सने भारताने कांगारूंचा पराभव केला. या विजयासह सामन्यामध्ये एक-दोन नाही तर तब्बल 17 रेकॉर्ड्सची नोंद झाली आहे.
IND vs AUS: दिल्ली टेस्टमध्ये बनले एकूण 17 रेकॉर्ड्स
1. 100 टेस्ट खेळण्याचा मान मिळवणारा चेतेश्वर पुजारा भारताचा 13वा खेळाडू ठरलाय. T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये, पुजारा हा पहिला क्रिकेटर आहे जो एकही T20 सामना न खेळता 100 कसोटी सामने खेळलाय.
2. चेतेश्वर पुजारा 100व्या टेस्ट सामन्यात शून्यावर बाद झाला. 100 व्या सामन्यात शून्यावर बाद होणारा तो जगातील आठवा फलंदाज ठरलाय.
3.100 डावांनंतर विरोधी टीम विरूद्ध सर्वाधिक रन्स
4800 – सचिन विरूद्ध ऑस्ट्रेलिया
4686 – सांगकारा विरूद्ध पाक
4615 – कोहली विरूद्ध ऑस्ट्रेलिया*
4301 – सचिन विरूद्ध श्रीलंका
4394 – सर विवियन रिचर्ड विरूद्ध ऑस्ट्रेलिया
4228 – लारा विरूद्ध ऑस्ट्रेलिया
4.ऑस्ट्रेलियाचा स्पिनर नॅथन लायनने चांगली गोलंदाजी करत 29 ओव्हर्समध्ये 67 रन्स देत 5 विकेट्स घेतलेत. यासह त्याने भारताविरुद्ध आठव्यांदा टेस्टच्या डावात पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेतल्यात.
5.या सामन्यात नॅथन लायनने भारताविरुद्धच्या टेस्ट क्रिकेटमधील 100 विकेट्स पूर्ण केले. यासह अशी कामगिरी करणारा तो जगातील तिसरा गोलंदाज ठरलाय.
6.अक्षर पटेलने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने 74 रन्सची खेळी खेळली. यासह अक्षरने टेस्ट क्रिकेटमधील दुसरं अर्धशतकही पूर्ण केलं.
7.गोलंदाजाने कोहलीची पहिली टेस्ट विकेट घेतली
के रबाडा
ए जोसेफ
एस मुथुसामी
ए नॉर्टजे
एम कुह्नमेन
8.रविचंद्रन अश्विनने क्रिकेटमध्ये 5000 रन्स आणि 700 विकेट्स पूर्ण केलेत.
9.पीटर हँड्सकॉम्बने ऑस्ट्रेलियासाठी टेस्टमध्ये 1000 रन्स पूर्ण केलेत. हा पराक्रम करणारा 109 वा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला.
10. उस्मान ख्वाजा (1362) ने त्याचा सहकारी मार्नस लॅबुशेनला मागे टाकून 2021-23 च्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये तिसरा सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू बनला.
11.सर्वात जलद 25000 आंतरराष्ट्रीय रन्स
549 डाव – विराट कोहली*
577 डाव – सचिन तेंडुलकर
588 डाव – रिकी पॉंटिंग
12.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिंगल डिजिट स्कोअरवर स्टीव्ह स्मिथ सर्वाधिक वेळा आऊट
4 वेळा – रवि अश्विन*
4 वेळा – स्टुअर्ट ब्रॉड
3 वेळा – ट्रेंट बोल्ट
13. 21व्या शतकात पदार्पण करणारा विराट कोहली हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 25000 रन्स पूर्ण करणारा पहिला खेळाडू.
14.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स
सचिन – 34357
संगकारा – 28016
पॉंटिंग – 27483
जयवर्धने – 25957
कॅलिस – 25534
कोहली – 25002*
15. मायदेशात झालेल्या गेल्या 44 टेस्टमध्ये भारताने केवळ 2 सामने गमावले आहेत
16.सलग चौथ्यांदा बॉर्डर गावस्कर कायम ठेवणारा भारत हा पहिला संघ ठरलाय.
17.रवींद्र जडेजाची या सामन्यात सामनावीर म्हणून निवड झाली. त्याच्या टेस्ट कारकिर्दीतील हा 8वा अवॉर्ड आहे. त्याने सचिन तेंडुलकरची बरोबरी केलीये.