India vs Australia 1st Test: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Ind vs Aus) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात कसोटी सामन्यातून (Nagpur Test) भारतीय फिरकी गोलंदाज रविंद्र जडेजाने (Ravindra Jadeja) जोरदार पुनरागमन केलं. पहिल्यात दिवशी जडेजाने जबरदस्त गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे पाच गडी तंबूत पाठवले. रविंद्र जडेजाने 22 ओव्हर्समध्ये 5 विकेट्स घेतल्या आणि सामना भारताच्या बाजूने फिरवला आहे. मात्र, पहिल्याच दिवशी सामना वादाच्या भोवऱ्यात अडकलाय. त्याला कारण पाच विकेट घेणारा रविंद्र जडेजा. जडेजावर बॉल टेंपरिंगचा (Ravindra Jadeja Ball Tampering) आरोप करण्यात आलाय.


मैदानावर नेमकं काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रवींद्र जाडेजाने गोलंदाजी करताना मोहम्मद सिराजकडून (Mohammed Siraj) काहीतरी घेतलं आणि ते आपल्या बोटावर चोळलं. जडेजा बोटाल क्रीम ( Pain Killer Cream) लावताना दिसला. ही गोष्ट नेमकी काय होती, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. तर दुसरीकडे क्रिडाविश्वास मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. इंग्लंडचा माजी क्रिकेटर आणि समालोचक मायकल वॉननेही (Michel Vaughan) यावर कमेंट करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे वाद आणखी पेटल्याचं दिसतंय. अशातच जडेजाने सामन्यानंतर महत्त्वाचं वक्तव्य केलंय.


काय म्हणाला Ravindra Jadeja?


पहिल्या दिवशी टर्निंग पीच नव्हती. इतर खेळपट्ट्यांच्या तुलनेत ती संथ होती आणि उसळीही कमी मिळत होती. जसजसा खेळ पुढे जाईल तसतसा त्याचा पाठलाग करणे कठीण होईल, पण कसोटी क्रिकेटमध्ये असेच घडतं, असं रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) म्हणाला आहे.


प्रत्येक चेंडू वळत नसल्यामुळे मी क्रीजचा वापर केला. बाऊन्सही संथ होता त्यामुळे मी फलंदाजांना गोंधळात टाकले. मी क्रीजमधून बाहेर पडून चेंडू स्टंपजवळ मारत होतो. अशा स्थितीत फलंदाज बाहेर येऊन खेळला तर विकेट मिळण्याची शक्यता असते. लबुशेन आणि स्मिथ यांनीही तीच चूक केली, असंही जडेजा म्हणाला.


आणखी वाचा - IND vs AUS : Ravindra Jadeja वर येणार बॅन? 'त्या' कृत्यानंतर बीसीसीआयने दिलं स्पष्टीकरण


दरम्यान,  बीसीसीआयच्या (BCCI) एका अधिकाऱ्याने या प्रकरणाची माहिती दिली आहे. बोर्डाच्या सूत्रांना सांगितलंय की, 'हे बोटातील वेदना कमी करण्यासाठीचं एक मलम' आहे. त्यामुळे आता जडेजा बॉल टेंपरिंगच्या विषयावर काय बोलणार याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.