Ind vs Aus : खुद्द एडम गिलक्रिस्ट झाला ऋषभ पंतचा `जबरा फॅन` म्हणतो, `मला आनंद वाटतोय की...`
ICC ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार सलामीवीर एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याने ऋषभ पंतचं (Rishabh Pant) तौंडभरून कौतुक केलंय.
Adam Gilchrist On Rishabh Pant : टीम इंडियाची (Team India) स्टार विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. मागील वर्षा झालेल्या अपघातानंतर आता तो एनसीएमध्ये सराव करताना दिसतोय. ऋषभ संघात नसल्याने आता टीम इंडियाचं वर्ल्ड कपमध्ये (World Cup 2023) काय होणार? असा सवाल विचारला जात होता. मात्र, ईशान किशनने ती जागा भरून काढली आहे. अशातच आता ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार सलामीवीर एडम गिलक्रिस्ट (Adam Gilchrist) याने ऋषभ पंतचं तोंडभरून कौतुक केलंय.
काय म्हणाला Adam Gilchrist ?
मला विश्वास आहे की ऋषभने जगभरातील विकेटकिपर फलंदाजांना त्याच्यासारखं खेळण्यासाठी प्रेरित केलं. ऋषभसारख्या युवा खेळाडूनं असा प्रभाव पाडला आहे, हे पाहून आनंद वाटतो. त्याच्या पाठोपाठ इतर खेळाडूही त्याच्यासारखाच सकारात्मक दृष्टिकोन ठेवून खेळू लागल्याचं दिसतंय. भारताकडे चांगले पर्याय आहेत. ऋषभ पंत बाहेर गेल्यानंतर केएल राहुलला संधी मिळाली. त्याने त्या संधीचं सोनं केलं. तर दुसरीकडे केएल जखमी असताना ईशान किशनला संधी मिळाली. त्याची त्याचा उपयोग केला अन् संघात जागा मिळवली. ईशानने खरोखरच चांगली कामगिरी केली. तो सकारात्मक राहिला आणि निवडकर्त्यांना त्याला संघात ठेवण्यास भाग पाडलं, असं एडम गिलक्रिस्ट म्हणतो.
एडम गिलक्रिस्ट याने यावेळी वर्ल्ड कप सामन्यांवर देखील भाष्य केलं. कोणत्या टीम फायनलमध्ये जातील यावर देखील त्याने आपलं मत मांडलं आहे. माझ्या मते भारत आणि पाकिस्तान उपांत्य फेरीत असले पाहिजेत. याशिवाय ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड उपांत्य फेरीत प्रवेश करू शकतात, असं एडम गिलक्रिस्ट म्हणतो.
आणखी वाचा - World Cup 2023 | "टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण...", कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!
दरम्यान, यंदाच्या वर्ल्ड कपला येत्या 5 ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. त्याआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यासाठी नुकतीच टीम इंडिया जाहीर झाली असून पहिल्या दोन सामन्यासाठी केएल राहुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्या दोन सामन्यात संघ कशी कामगिरी करणार यावर सर्वांचं लक्ष असणार आहे. तिसरा सामना भारतासाठी सराव सामन्यासारखा असणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामन्यात असणार आहे.