Ind vs Aus Semifinal Women T20 World Cup: आयसीसी महिला टी-20 वर्ल्डकपमध्ये (Women T20 World Cup) आज भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus) यांच्यामध्ये सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. दोन्ही टीम्समध्ये भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 6.30 वाजता सुरु होणार आहे. भारतीय टीम ग्रुप-बीमध्ये दुसऱ्या स्थानावर असून तिने सेमीफायनल (Ind vs Aus Semifinal) गाठली आहे. तर ऑस्ट्रेलियाने ग्रुप-एमध्ये सर्व सामने जिंकली आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सेमीफायनलच्या सामन्यात केपटाऊनमध्ये सर्वांचं लक्ष वातावरणावर असणार आहे, खासकरून भारतीय चाहत्यांचं. टीम इंडिया विरूद्ध आयर्लंड या सामन्यामध्ये पावसाने खेळ केला होता. त्यावेळी डकवर्थ लुईसच्या नियमानुसार, भारताचा विजय झाला होता. मात्र आजच्या सामन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पावसाची शक्यता नाही. मात्र जरी सामन्यादरम्यान पाऊस आला तरीही फायनल कोण गाठणार हे आपण पाहूया.


सेमीफायनलमध्ये पावसाने खेळ केला तर...


जर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्या वर्ल्डकपच्या सेमीफायनलच्या सामन्यात पावसाने घोळ घातला आणि मिनिमम ओव्हर्सही नाही खेळवता आले तरी चिंतेची बाब नाही. कारण आयसीसीने सेमीफायनलच्या सामन्यासाठी खास रिझर्व डे ठेवला आहे. म्हणजेच 23 फेब्रुवारी रोजी पावसाच्या व्यत्ययामुळे सामना होऊ शकला नाही, तर हा सामना 4 फेब्रुवारी रोजी तिथूनच सुरु होईल, ज्या ठिकाणहून थांबवण्यात आला होता. 


जर या सामन्याच्या रिझर्व डे ला देखील निर्णय झाला नाही किंवा या दोन्ही दिवशी सामना होऊ शकला नाही. कर ग्रुप स्टेजच्या पॉईंट्सच्या आधारावर निर्णय घेतला जाईल. अशा स्थितीमध्ये ऑस्ट्रेलिया टीम फायनलमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. कारण ग्रुप एमध्ये ती पहिल्या स्थानावर होती. 


दोन्ही टीम्सची संभाव्य प्लेइंग-11


टीम इंडिया


स्मृति मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिगेज, शेफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड़, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, रेणुका सिंह ठाकुर.


ऑस्ट्रेलिया टीम


मेग लॅनिंग (कर्णधार), बेथ मूनी, एलिसा हीली, एलिसा पेरी, एश्ले गार्डनर, ताहिलिया मॅक्ग्रा, ग्रेस हॅरिस, जेस जोनासेन, एलाना किंग, मेगन शूट, डार्सी ब्राउन.