Ind Vs Aus 2nd ODI: विशाखापट्टणम येथे खेळल्या जात असलेल्या भारत विरुद्धच्या तीन एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यातही स्टीव्ह स्मिथ (Steve Smith) ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करत आहे. त्याचवेळी भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियात परतलाय. मात्र, या सामन्यात भारत अडचणीत सापडल्याचं पहायला मिळतंय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार टी-ट्वेंटी स्टार वनडेमध्ये फेल ठरल्याचं पहायला मिळतंय. (IND vs AUS Suryakumar Yadav records second consecutive ODI golden duck against Mitchell Starc latest sports news)


मिचेल स्टार्कचा भेदक मारा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क (Mitchell Starc) भारतीय टॉप ऑर्डर पुन्हा एकदा चाचपडताना दिसली. मिचेल स्टार्कच्या घातक माऱ्यासमोर कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma), शुभमन गिल (Shubman Gill), सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि केएल राहुल (KL Rahul) फेल झाल्याचं दिसून आलंय.


टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल


टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 175 च्या स्टाईक रेटने गोलंदाजांची धुलाई करणारा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) वनडेमध्ये पुन्हा फेल झालाय. सलग दोन सामन्यात सूर्या गोल्डन डक (Golden Duck) झालाय. त्यामुळे टी-ट्वेंटीचा शेर वनडेत फेल झाल्याचं पहायला मिळतंय. मागील सामन्यात देखील सूर्यकुमार स्टार्कचा सामना करताना बाद झाला होता. त्यानंतर आता पुन्हा तो दुसऱ्या सामन्यात भोपळा न फोडता तंबुत परतला आहे.


आणखी वाचा - WTC Final: ना पंत ना संजू, 'हा' खेळाडू असेल टीम इंडियाचा विकेटकीपर; Ravi Shastri यांची मोठी भविष्यवाणी


सूर्यकुमार यादवची वनडे कारकीर्द (Suryakumar Yadav ODI)


सूर्यकुमारने आत्तापर्यंत एकदिवसीय (Suryakumar Yadav ODI Career) सामन्यात 22 सामने खेळले आहेत. त्यातील 20 इनिंगमध्ये त्याने फक्त 433 धावा केल्यात त्यात फक्त 2 अर्धशतक त्याच्या नावावर आहे. वनडे सह टेस्ट सामन्यात देखील सूर्याला चांगली कामगिरी करता आली नाही.



रोहित इस बॅक


दुसऱ्या सामन्यासाठी टीम इंडियाने दोन बदल केले आहेत. इशान किशनच्या जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) संघात परतलाय. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरच्या जागी अक्षर पटेलला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळालंय. त्याचबरोबर, ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिशच्या जागी अॅलेक्स कॅरीला संघात स्थान देण्यात आलंय. तर दुखापतग्रस्त ग्लेन मॅक्सवेलच्या जागी नॅथन एलिसला संधी मिळालीये.