पर्थ :  टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा (India vs Australia) वॉर्मअप सामना अतिशय थरार पद्धतीने 6 धावांनी जिंकला. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार मोहम्मद शमी (mohmmad shami) ठरला आहे. त्याने शेवटच्या ओव्हरमध्ये येऊन ऑस्ट्रेलियाचे धडाधड विकेट काढत टीम इंडियाला (Team India)  विजय मिळवून दिला.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाला शेवटच्या ओव्हरमध्ये 11 धावांची गरज होती. यावेळी रोहित शर्माने (Rohit sharma) मोहम्मद शमीला (mohmmad shami) बॉल टाकण्यासाठी मैदानात बोलावले. हे शमीची सामन्यातली पहिलीच ओव्हर होती. शमीने या ओव्हरमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी करत 6 चेंडूत केवळ 4 धावा देत 3 विकेट घेतल्या. आणि टीम इंडियाच्या (Team India) विजयाचा शिल्पकार ठरला. 


हे ही वाचा : Ind vs Aus : किंग कोहलीची सुपर कॅच, VIDEO आला समोर 


विशेष म्हणजे मोहम्मद शमी (mohmmad shami) संपुर्ण सामना बाहेर बसला होता. ज्यावेळेस शेवटची ओव्हर कोणाला द्यावी असा प्रश्न रोहितला पडला, तेव्हा त्याने शमीला मैदानात बॉलिंगसाठी बोलावले. आणि शमीने रोहितचा हा निर्णय यशस्वी करून दाखवला.  


शेवटच्या ओव्हरचा थरार


पहिला बॉल: पॅट कमिन्सने 2 धावा घेतल्या
दुसरा बॉल: पॅट कमिन्सने पुन्हा 2 धावा घेतल्या
तिसरा बॉल: पॅट कमिन्स कॅच आऊट
चौथा बॉल: अॅश्टन अगर रनआऊट झाला
पाचवा बॉल: शमीने जोश इंग्लिसला क्लीन बोल्ड 
सहावा बॉल: शमीने केन रिचर्डसनला क्लीन बोल्ड



दरम्यान अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (mohmmad shami) नुकतचं कोरोनाला हरवल होत, त्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करताच त्याने आपल्या बॉलिंगची कमाल दाखवली. या त्याच्या गोलंदाजीने टीम इंडियाने 6 धावांनी हा सामना जिंकला.