पर्थ : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरूद्धचा (India vs Australia) वॉर्मअप सामना 6 धावांनी जिंकला आहे. या विजयानंतर टीम इंडियाचा (Team India) उत्साह आणखीण वाढला आहे. तसेच हीच विजय लय कायम ठेवण्याच्या इराद्याने आता टीम इंडिया वर्ल्ड कप खेळणार आहे.
  
टीम इंडियाने आणि ऑस्ट्रेलियात (India vs Australia) आज तिसरा वॉर्म अप सामना पार पडला. या वॉर्म अप सामन्यात टीम इंडियाने (Team India) प्रथम फलंदाजी करून 7 विकेट गमावत 187 धावा ठोकल्या होत्या. टीम इंडियाकडून के एल राहूल आणि सुर्यकुमार यादवने अर्धशतक ठोकलं होतं. या बळावर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर 188 धावांचे आव्हान ठेवलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे ही वाचा : 2,2,W,W,W,W…मोहम्मद शमीची एकच ओव्हर, आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव 


टीम इंडियाने दिलेल्या 188 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात चांगली झाली होती. ओपनिंगला उतरलेल्या मिचेल मार्शने 35 आणि अॅरोन फिंचने 76 धावा टोकल्या. या दोघांची विकेट पडल्यानंतर ऑस्ट्रेलियाला गळतीच लागली.एका मागून एक विकेट पडल्या. तर शमीच्या शेवटच्या ओव्हरने तर कहरच केला. 


मोहम्मद शमीच्या (Mohammed Shami) शेवटच्या ओव्हरमध्ये 4 विकेट पडल्या. यातील 3 त्याच्या खात्यातल्या विकेट होत्या. तर एक रनआऊट होता. शेवटच्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर मोहम्मद शमीसमोर पॅट कमीन्स होता. शमीने पॅट कमीन्सला (Pat Cummins) बॉल टाकताच त्याने तो सीमा रेषेवर मारला. एका वेळेस असं वाटत होत हा बॉल सिक्स जाईल.मात्र विराट कोहलीने (Virat Kohli) उडी मारत एका हाताने अफलातून कॅच घेतला. अतिशय अवघड असा हा कॅच होता. मात्र कोहलीने तो कॅच घेऊन मॅचच फिरवून टाकली. 




दरम्यान या आधी देखील त्याने उत्कृष्ट फिल्डींग करून ऑस्ट्रेलियाच्या टीम डेव्हीडला रनआऊट केलं होत. विराट कोहलीचा तो रनआऊट आणि मोहम्मद शमीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये घेतलेली ती कॅच टीम इंडीयाच्या विजयाचा मार्ग आणखीण सोप्पा करून गेली. त्यानंतर शमीने त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीने आणखीन दोन विकेट घेतले. या विकेटनंतर टीम इंडियाने 6 धावांनी  हा सामना जिंकला.