IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 (Border–Gavaskar Trophy) खेळवली जातेय. याचा शेवटचा सामना गुरुवारी अहमदाबाद स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान ही सिरीज सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी भारतीय पीचसंदर्भात अनेक मुद्दे उपस्थित केले होते. त्यामुळे चौथ्या टेस्ट सामन्यामध्ये पीच कसं असणार आहे, याची माहिती घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी या सिरीजचा चौथा आणि शेवटचा सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाने या सिरीजमध्ये 2-1 अशी आघाडी घेतली आहे. मात्र वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) दृष्टीने हा सामना टीम इंडियासाठी फार महत्त्वाचा मानला जातोय. मात्र आपल्याची पीचच्या जाळ्यात टीम इंडिया अडकणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.


चौथ्या टेस्टमध्ये पीच कोणासाठी ठरणार फायदेशीर


भारत और ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सामना सुरु होण्यापूर्वीच पीचबाबत मोठं घमासान झालं होतं. त्यामुळे चौथ्या टेस्टसाठी वापरल्या जाणाऱ्या पीचला फार काळजीपूर्वक तयार जाणार आहे. दरम्यान याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून सामन्यासाठी 2 पीच तयार केले जातायत. मात्र यापैकी कोणत्या पीचचा वापर केला जाईल याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. 


कसं आहे अहमदाबादचं पीच?


अहमदाबाद स्टेडियमचं पीच हे अधिक बाउन्स असल्याचं लक्षात आलं आहे. वेगवान गोलंदाजांना याठिकाणी चांगली संधी मिळू शकते. वेगवान गोलंदाजांसोबतच ही खेळपट्टी स्पिनर्ससाठीही फायदेशीर ठरणार आहे. त्यामुळे जसजसा खेळ पुढे जाणार तसा याठिकाणी तसतशी स्पिनर्सना मदत मिळत राहणार आहे. याशिवाय सुरुवातीच्या काळात या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं होईल. 


ICC ची इंदूरच्या पीचवरून कडक कारवाई


ICC ने इंदूरच्या पीचवरून कडक कारवाई केलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला 'खराब' असा करार दिला आहे. इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आयसीसीने दिलेल्या खराब रेटिंगमुळे इंदूरच्या होळकर स्टेडियमला 3 डिमेरिट्स पॉइंट देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पुढील पाच वर्ष एक्विव्ह राहणार आहेत.