कोलकाता : टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली याने ऑस्ट्रेलियाविरोधात सेंच्युरी केली नाही मात्र, तरीही त्याने एक नवा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया विरोधातल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये विराट कोहलीने ९२ रन्स करत आऊट झाला. विराट कोहलीला सेंच्युरी करण्यात अपयश आलं. विराटने सेंच्युरी केली असती तर त्याने रिकी पॉन्टिंगला वन-डे मॅचेसमध्ये सर्वाधिक सेंच्युरी करण्याच्या बाबतीत मागे टाकलं असतं.


मात्र, विराट कोहलीला सेंच्युरी करण्यात अपयश आलं. असे असलं तरीही त्याने हाफ सेंच्युरी करत भारताच्या दोन माजी कॅप्टन्सच्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.


कोलकातामध्ये झालेल्या दुसऱ्या वन-डे मॅचमध्ये विराटने आपल्या करिअरची ४५वी हाफ सेंच्युरी केली. २०१७मधील विराटची ही ११वी वन-डे मॅचेसमधील हाफ सेंच्युरी आहे. यासोबतच त्याने एका वर्षात कुठल्याही कॅप्टनने केलेल्या सर्वाधिक ५०हून अधिक रन्सची बरोबरी केली आहे.


यापूर्वी मोहम्मद अझहरुद्दीन आणि एमएस धोनी यांनी हा रेकॉर्ड केला होता. अझहरुद्दीनने १९९८ मध्ये कॅप्टन असताना ११ हाफ सेंच्युरी वर्षभरात केल्या होत्या. तर, महेंद्र सिंग धोनीने २००९ साली हा कारनामा आपल्या नावावर केला होता.