IND vs AUS : तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा (ind vs aus) 5 गडी राखून पराभव करत मालिका 2-1 जिंकली.  सूर्यकुमार यादव (suryakumar yadav) आणि विराट कोहली (virat kohli) यांच्या अर्धशतकांनी भारताला (team india) विजय मिळवून दिला. दोन्ही फलंदाजांमध्ये तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही झाली. फॉर्ममध्ये परतलेल्या विराट कोहलीने (virat kohli) आपल्या डावाची आक्रमक सुरुवात केली. पहिल्या काही चेंडूंत विराट चौकार ठोकत होता. पण जेव्हा सूर्यकुमार यादवने वेगवान खेळायला सुरुवात केली तेव्हा कोहली संथ गतीने खेळू लागला. कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma)  आणि प्रशिक्षक राहुल द्रविडने (rahul dravid) त्याला डगआउटमधून काहीतरी सांगितलं असं विराटने सामन्यानंतर म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामना संपल्यानंतर किंग कोहली (virat kohli) म्हणाला की, "जेव्हा सूर्याने आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली तेव्हा मी डग आऊटकडे पाहिले. रोहित आणि राहुल भाई दोघेही मला म्हणाले, तू फक्त फलंदाजी करत राहा  कारण सूर्या चांगली फटकेबाजी करत आहे. हे फक्त एक भागीदारी तयार करण्याबद्दल होते. मी माझ्या अनुभवाचा थोडासा उपयोग केला."


यावेळी विराट कोहलीने सूर्यकुमार यादवचे कौतुक देखील केले. "काय करायचे आहे याबद्दल त्याला पूर्ण स्पष्टता आहे. त्याच्याकडे कोणत्याही स्थितीत फलंदाजी करण्याची क्षमता आहे हे त्याने आधीच दाखवून दिलं आहे. सूर्यकुमारने इंग्लंडमध्ये शतक झळकावले, आशिया कपमध्ये त्याने शानदार फलंदाजी केली. इथे तो जोरदार फलंदाजी करतोय. तसेच मी त्याला खेळताना पाहिलं होतो. गेल्या 6 महिन्यांपासून तो चांगला खेळत आहे. त्याच्याकडे विविध प्रकारचे शॉट्स आहेत आणि ते शॉट्स योग्य वेळी खेळणे हे एक जबरदस्त कौशल्य आहे. तो असा माणूस आहे ज्याला त्याचा खेळ आतून माहित आहे. त्याला वेळेची देणगी मिळाली आहे आणि त्याला खेळताना पाहून मी थक्क झालो," असे विराट कोहली म्हणाला.


दरम्यान, नाणेफेक गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने 7 विकेट्स गमावून 186 धावा केल्या. भारतानने हे आव्हान 19.5 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले. यादरम्यान विराट कोहलीने 63 आणि सूर्यकुमार यादवने 69 धावा केल्या. मात्र, सामनावीराचा पुरस्कार अक्षर पटेलला देण्यात आला. अक्षरने 4 षटकांत 33 धावा देऊन तीन मोठे बळी घेतले.