IND vs AUS: वर्ल्डकप, सेमीफायनल, कर्णधार रन आउट आणि भारताचा पराभव; केपटाऊनमध्ये चाहत्यांना आठवला धोनी
या सामन्यात असं काही घडले की, अचानक चाहत्यांना भारतीय पुरुष टीमचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ची आठवण झाली.
IND W vs AUS W: गुरुवारी केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा (India vs Australia) रोमांचक सामन्यात 5 रन्सने पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाच्या टीमने अंतिम फेरीत (Women's T20 World Cup 2023 Final) प्रवेश केलाय. दरम्यान या सामन्यात असं काही घडले की, अचानक चाहत्यांना भारतीय पुरुष टीमचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) ची आठवण झाली.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 172 रन्स केले. 173 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला केवळ 167 रन्स करता आले. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने (Harmanpreet Kaur) सर्वाधिक रन्स केले. मुळात ती जोपर्यंत क्रीजवर होती तोपर्यंत टीम इंडिया (Team India) विजयी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र ती रनआऊट होताच टीम इंडियाच्या विजयाच्या आशा मावळल्या.
हरमनप्रीतने तिचं अर्धशतक पूर्ण केलं आणि टीम इंडियाची बुडती नौका वाचवण्याचा प्रयत्न केला. पण 2019 च्या वर्ल्डकपमध्ये एमएस धोनी जसा आऊट झाला त्याच पद्धतीने ती आऊट झाली. यानंतर युजर्सनी धोनी आणि हरमनप्रीतचा रन आऊटचा फोटो शेअर करायला सुरुवात केली.
हरमनप्रीतची कडवी झुंज व्यर्थ (Harmanpreet Kaur)
हरमनप्रीत कौरने सेमीफायनलच्या सामन्यात कॅन्टन इनिंग खेळली. कौरने 34 बॉल्समध्ये 52 रन्सची खेळी केली. तिच्या या खेळीमध्ये 6 फोर आणि एका सिक्सचा समावेश आहे. जेमिमाने हरमनप्रीतला चांगली साथ दिली होती. मात्र टीम इंडियाला विजय मिळवता आला नाही
टीम इंडियाची फलंदाजी
टी-20 वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलच्या सामन्यात 173 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 8 विकेट गमावून 167 रन्स केले. या सामन्यात भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक ठोकलं. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 24 बॉल्समध्ये 43 रन्स केले.
भारतीय टीमच्या 3 विकेट्स अवघ्या 28 रन्सवर पडल्या होत्या. ओपनर शेफाली वर्मा 9, स्मृती मंधाना 2 तर यास्तिका भाटिया 4 रन्स करून पॅव्हेलियनमध्ये परतल्या. यानंतर जेमिमा रॉड्रिग्ज आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांनी चौथ्या विकेटसाठी 69 रन्सची भागीदारी केली.