BAN vs IND, 1st Odi : टीम इंडियाला पहिल्या पराभवानंतर मोठा झटका, आयसीसीची मोठी कारवाई
आयसीसीने (Icc) बांगलादेश विरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियावर (Team India) मोठी कारवाई केली आहे.
Slow Over Rate : टीम इंडियाला (Team India) पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशकडून (BAN vs IND 1st Odi) पराभव स्वीकारावा लागला. थरारक झालेल्या सामन्यात बांगलादेशने अवघ्या 1 विकेटने विजय मिळवला. बांगलादेशने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. टीम इंडियाला हातातोंडाशी आला विजय मिळवता आला नाही. या पराभवानंतर टीम इंडियाला मोठा फटका बसला आहे. आयीसीसीने (Icc) टीम इंडियावर स्लो ओव्हर रेटमुळे (Slow Over Rate) दंडात्मक कारवाई केली आहे. (ind vs ban 1st odi icc take action against team india due to slow over rate 80 percent match fee fined)
आयसीसीच्या नियमांनुसार प्रत्येक तासात अपेक्षित षटकांचा खेळ व्हायला हवाच. मात्र टीम इंडियाकडून या नियमांचं उल्लंघन झालं. यामुळे आयसीसीने टीम इंडियाला स्लो ओव्हर रेटसाठी एकूण मानधनाच्या 80 टक्के दंड ठोठावला आहे. सामन्यात नियमांचं पालन होतंय की नाही, हे पाहण्याची जबाबदारी सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरीची असते. त्यानुसार रंजन मदुगले यांनी टीम इंडियाने अपेक्षित वेळेत 4 ओव्हर कमी टाकल्याचा निर्णय सुनावला.
आयसीसीकडून प्रत्येक ओव्हरसाठी एकूण मानधानाच्या 20 टक्के मानधन हे दंड म्हणून आकारलं जातं. टीम इंडियाने 4 ओव्हर्स कमी टाकल्या. त्यामुळे टीम इंडियाला मानधनाचे 80 टक्के रक्कम ही दंड द्यावी लागणार आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मानेही आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य केलंय.
टीम इंडियासाठी 'करो या मरो'
दरम्यान टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आता टीम इंडियाला मालिका विजयासाठी पुढील 2 सामने जिंकणं आवश्यक असणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना हा बुधवारी 7 डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे.