Rohit Sharma Injury Updates: सध्या टीम इंडिया (team india) बांग्लादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचे अनेक खेळाडू दुखापतीचा सामना करतायत. या यादीत कॅप्टन रोहित शर्मा सुद्धा आहे. रोहित शर्माच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झालीय. त्यामुळे तो पहिला कसोटी सामना खेळत नाहीय. याचदरम्यान पण, या सगळ्यामध्ये कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) बद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेशविरुद्धच्या वन डे मालिकेत रोहितच्या अंगठ्याला दुखापत झाली होती आणि त्याने तिसऱ्या वन डे सह पहिल्या कसोटीतून  माघार घेतली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) दुसऱ्या वनडे दरम्यान अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले होते. स्कॅन केल्यानंतर रोहितचा अंगठा निखळल्याचे आढळून आले. यानंतर रोहित उपचारासाठी मुंबईत आला आणि आता रोहित पूर्णपणे तंदुरुस्त असून दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करण्यास सज्ज असल्याचे बोलले जात आहे. असे असताना बीसीसीआयच्या सूत्राने सांगितले की, रोहित शर्मा बांगलादेशला आज किंवा उद्या रवाना होणार आहे.  


वाचा : "माझा मुलगा असल्याने अर्जुनवर...", मॅचच्या आधी सचिनने दिला होता हा सल्ला


 


बीसीसीआयने (BCCI) रोहितच्या दुखापतीबद्दल आधीच सांगितले होते की, वैद्यकीय संघ त्याची पूर्ण काळजी घेत आहे आणि आम्हाला आशा आहे की तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या फॉर्मवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.T20 World Cup स्पर्धेत पराभवानंतर टीम इंडियाने बांगलादेशविरुद्धची वनडे मालिकाही गमावली. यानंतर रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने आशिया कपही गमावला होता. 


याचदरम्यान भारतीय संघाने पहिल्या कसोटीवर मजबूत पकड घेतली आहे. भारताने पहिल्या डावात 404 धावसंख्या उभी केली. त्यानंतर मोहम्मद सिराज ( Mohammed Siraj) व कुलदीप यादव ( Kuldeep Yadav) यांनी बांगलादेशला धक्के दिले. कुलदीपने कसोटी कारकीर्दित तिसऱ्यांदा डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. अक्षर पटेलने शेवटची विकेट घेत बांगलादेशचा पहिला डाव 150 धावांत गुंडाळला. 254  धावांची आघाडी असताना भारताने फॉलो ऑन न देता पुन्हा फलंदाजीला येण्याचा निर्णय घेतला.