IND VS BAN Test : भारत - बांगलादेश सामन्यात राडा, पंत आणि लिटन दास भिडले, मैदानात नेमकं काय घडलं? Video
India vs Bangladesh Test Match : पहिल्या टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला.
IND VS BAN 1st Test Rishabh Pant And Litton Das Fight : भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामान्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात असून गुरुवार 19 सप्टेंबर रोजी पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिला टेस्ट सामना सुरु होऊन तासाभरातच भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात मैदानात वाद झाला.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरु असलेल्या भारत - बांगलादेश यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याचा टॉस बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसेन शांतोने जिंकला. त्यामुळे टीम इंडियाला प्रथम फलंदाजीचे आव्हान मिळाले. बांगलादेशचा 24 वर्षीय गोलंदाज हसन महमूदने बांगलादेशला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्या 10 ओव्हरमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली अशा भारताच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या. यामुळे रोहित आणि विराट केवळ 6 धावा करून तर शुभमन गिल एकही धाव न करता पॅव्हेलियनमध्ये परतला.
पंत - लिटन दासमध्ये झाला वाद :
टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपूर्वी 16 व्या ओव्हरला मैदानात भारताचा फलंदाज ऋषभ पंत आणि बांगलादेशचा विकेटकिपर लिटन दास यांच्यात वाद पाहायला मिळाला. ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर ऋषभ पंतला एक धाव घ्यायची होती. पण यशस्वीने त्याला नकार दिला आणि परत पाठवले. दरम्यान फिल्डिंग करत असलेल्या बांगलादेशी खेळाडूने बॉल थ्रो केला आणि तो थेट पंतच्या पॅडला लागून मिड विकेटला लागली. ज्यामुळे ऋषभ पंत रागावला. यावेळी ऋषभ पंत विकेटच्या मागे उभ्या असलेल्या लिटन दासला रागावून म्हणाला, "त्याच्या जवळ टाक ना भाऊ, मला का मारतोय". आता या व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे.
ऋषभ पंतचं टेस्ट टीममध्ये पुनरागमन :
भारताचा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतचा डिसेंबर 2022 मध्ये कर अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेला ऋषभ पंत तब्बल 15 महिने क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहिला. ऋषभ पंतने पूर्णपणे बरा झाल्यावर आयपीएल 2024 मध्ये पुनरागमन केले. त्यानंतर त्याला टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये खेळण्याची संधी मिळाली यातही तो भारताच्या विजेत्या संघाचा भाग होता. आता अनेक महिन्यांनी ऋषभ पंत बांगलादेश विरुद्ध टेस्ट क्रिकेटमध्ये पुनरागमन करत आहे. या सामन्यात भारतीय संघ संकटात असताना ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी मैदानात टिकून राहत भारताची बाजू सांभाळली. ऋषभ पंतने पहिल्या इनिंगमध्ये 39 धावा केल्या. हसन महमूदने त्याची विकेट घेतली.
हेही वाचा : पहिले रोहित - गिल, नंतर विराट... 24 वर्षाच्या पोरानं भारताच्या दिग्गजांना 10 रन सुद्धा बनवू दिले नाहीत
भारताची प्लेईंग 11:
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज
बांगलादेशची प्लेईंग 11:
शादमान इस्लाम, झाकीर हसन, नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा